rohit sharma with rahul dravid twitter
Sports

Rohit Sharma Record: शिष्य पडला 'गुरु'वर भारी! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित शर्माने राहुल द्रविडलाही सोडलं मागे

Rohit Sharma Breaks Rahul Dravid Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात रोहित शर्माने राहुल द्रविडला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील प्रेमदासाा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठा कारनामा करुन दाखवला आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना २ धावा करताच त्याने राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

रोहितने राहुल द्रविडला सोडलं मागे

ही मालिका सुरु होताच रोहित शर्माला राहु द्रविडचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी होती. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविडला मागे सोडण्यासाठी रोहितला अवघ्या ६० धावांची गरज होती. हा रेकॉर्ड पहिल्याच वनडे सामन्यात मोडला गेला असता. मात्र पहिल्या वनडेत तो हा ५८ धावांवर माघारी परतला. त्यामुळे हा रेकॉर्ड २ धावांनी थोडक्यात बचावला. दरम्यान दुसऱ्या सामन्यात त्याने सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडला मागे सोडलं आहे.

राहुल द्रविडने वनडे क्रिकेटमध्ये १०७६८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी १०७६६ धावा केल्या होत्या. त्यामुळे राहुल द्रविडला मागे सोडण्यासाठी त्याला अवघ्या २ धावा करायच्या होत्या. दरम्यान भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत.

पहिल्या वनडेत अर्धशतक

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर तो पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्याच सामन्यात त्याने ५८ धावांची शानदार खेळी केली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT