mumbai indians
mumbai indians  twitter
क्रीडा | IPL

Rohit Sharma On Loss: दारुण पराभवानंतर हिटमॅन भडकला! 'या' खेळाडूला कारणीभूत ठरवत सांगितलं पराभवाचं खरं कारण

Ankush Dhavre

GT vs MI, Qualifier 2: आयपीएल २०२३ स्पर्धेचा क्वालिफायर २ चा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा ६२ धावांनी पराभव केला.

यासह सलग दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत गुजरात टायटन्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत रंगणार आहे. दरम्यान दारुण पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

सामन्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

या सामन्यात पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, ' ही चांगली टोटल होती. शुभमन गिलने खरचं चांगली फलंदाजी केली. खेळपट्टी देखील फलंदाजी करण्यासाठी उत्तम होती. गुजरातने फलंदाजी करताना २५ धावा जास्त केल्या. जेव्हा आम्ही फलंदाजी करण्यासाठी आलो तेव्हा आम्ही सकारात्मक होतो. आम्हाला पार्टनरशिपची गरज होती. जे आम्ही करू शकलो नाही. मात्र सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनने चांगली फलंदाजी केली.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'आम्ही पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना विकेट्स गमावल्या. त्यामुळे आम्हाला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. आम्हाला अशा एका फलंदाजाची गरज होती जो शुभमन गिल सारखा शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करू शकेल. आमच्या फलंदाजीत सकारात्मकता होती. काही युवा खेळाडू आहेत, ज्यांच्या कामगिरीवर येणाऱ्या हंगामातही लक्ष असेल. गेल्या सामन्यात जे झालं ते पाहता आमची कामगिरी नक्कीच चांगली होती. शुभमनला श्रेय द्यायलाच हवं, तो जोरदार फॉर्ममध्ये आहे. मी आशा करतो की, तो ही कामगिरी यापुढे ही करेल.' (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने ६० चेंडूंचा सामना करत १२९ धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने ४३ धावांची विस्फोटक खेळी केली. शेवटी कर्णधार हार्दिक पंड्याने २८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचवली.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर टिळक वर्माने ४३ आणि कॅमेरून ग्रीनने दुखापतग्रस्त असूनही ३० धावांची बहुमूल्य खेळी केली. मात्र मुंबईचा संघ विजयापासून ६२ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दिल्ली काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

SCROLL FOR NEXT