TEAM INDIA TWITTER
Sports

World Cup Final 2023: हृदयद्रावक! फायनल गमावल्यानंतर रोहित अक्षरशः रडला; सिराजलाही अश्रू अनावर,Video

Ind vs Aus, World Cup Final 2023: या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय खेळाडू निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Crying Video:

ग्लेन मॅक्सवेलचा तो विनिंग शॉट अन् १.३० लाख लोकं शांत झाली. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू मैदानाच्या दिशेने धाव घेत होते. मैदानावर आतिषबाजी सुरू होती. तर दुसरीकडे पराभवामुळे निराश झालेले भारतीय खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसून येत होते.

हे चित्र भारतीय क्रिकेट फॅन्स कधीच विसरू शकणार नाही. काही खेळाडू मैदानावरच बसले, काही कॅपच्या साहाय्याने आपलं तोंड लपवत होते. यादरम्यान लक्ष वेधलं ते रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजने.

ग्लेन मॅक्सवेलने धाव पूर्ण करताच रोहितने पॅव्हेलियनची वाट धरली होती. सुरुवातीला तो हळू हळू चालत होता. त्यानंतर त्याचे पाय वेगाने चालू लागला. चेहऱ्यावर नैराश्य आणि अश्रू लपवत तो पुढे जात होता. दरम्यान मैदानाच्या बाहेर जात असताना त्याला अश्रू अनावर झाले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागले आहेत.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तर मैदानावरच रडू लागला. त्याला अश्रू अनावर झाले होते. तो रडत असताना संघातील इतर खेळाडू त्याला सांत्वन करताना दिसून आले. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याला मीठी मारताना दिसून आला.

भारताचा संघ गेल्या १० सामन्यांमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यातही भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (Latest sports updates)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेडने १३७ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT