Rohit Sharma x (twitter)
Sports

Rohit Sharma : हिटमॅनचा मास्टरक्लास! रोहितने केली फिल्ड सेट अन् हार्दिकला मिळाली गिलची विकेट, Video व्हायरल

MI VS GT Match Live Updates : अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये गुजरातने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये १९६ धावा केल्या आहे.

Yash Shirke

Rohit Sharma Video : मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यामध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करत आहे. या सामन्यामध्ये शुबमन गिलला हार्दिक पंड्याने बाद केले. पण त्याआधी शुबमन गिल हा साई सुदर्शनसह तुफानी खेळ करत होता. आठव्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने मैदानातील फिल्डमध्ये थोडा बदल करण्याचे हार्दिकला सुचवले. रोहितने फिल्ड सेट केल्यानंतर शुबमन गिलची विकेट मिळाली. मुंबई इंडियन्सचे चाहते रोहितच्या या कौशल्याचे कौतुक करत आहेत.

आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी झुंज देत आहेत.

गुजरात टायटन्सकडून सलामीला शुबमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. त्यांनी संयमी सुरुवात करत डाव पुढे नेला. पावरप्लेच्या अखेरीस दोन्ही सलामीवीरांनी मिळून ६६ धावा केल्या. शुबमन गिलने ३८ धावा केल्या, तर जॉस बटलरने ३९ धावांचे योगदान दिले. साई सुदर्शनने सर्वाधिक ६३ धावा केल्या. गुजरात टायटन्सने १९६ अशी धावसंख्या केली.

मुंबईची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू

गुजरातची प्लेईंग ११ -

शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकिपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT