rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Captaincy: रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार? समोर आली मोठी अपडेट

Rohit Sharma News In Marathi: भारतीय संघाचा कर्णधारपद रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी गेली काही महिने वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. न्यूझीलंडने भारतात येऊन कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभूत केलं. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या लाजिरवाण्या कामगिरीनंतर रोहितने कर्णधारपद सोडावं अशी मागणी जोर धरु लागली होती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता सर्वांनाच उत्तर मिळालं आहे. दरम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

सर्व खेळाडू मे पर्यंत आयपीएल २०२५ स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघासमोर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं आव्हान असणार आहे. भारतीय संघ जून- जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसून येणार आहे.

दरम्यान इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. बीसीसीआय पुन्हा एकदा रोहितकडे ही जबाबदारी सोपवू शकते. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कर्णधार म्हणून हिट

एक- दोन मालिका गमावल्या म्हणून कुठलाही कर्णधार वाईट होत नसतो. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती .

त्यानंतर दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. यापूर्वी २०२३ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. असं म्हटलं जात होतं की, चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर रोहित वनडे क्रिकेटला रामराम करु शकतो. मात्र असं काहीच झालेलं नाही. त्याने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

कसा राहिलाय रेकॉर्ड?

रोहितचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने आतापर्यंत ६७ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४३०२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतक आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT