rohit sharma google
Sports

Rohit Sharma: शेवटची वेळ, अलविदा...रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून घेणार रिटायमेंट? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ

Rohit Sharma Signing Off Instagram Post: भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे सीरीजनंतर रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याची वनडे मालिका २५ ऑक्टोबर रोजी संपली. दोन सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने कमबॅक करत ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. हिटमॅन आणि किंग कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने तिसरा सामना जिंकला. सिडनी वनडेमध्ये नाबाद १२१ धावा करुन रोहितने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या मालिकेत, रोहितने एक शतक तर एक अर्धशतक झळकावले आणि मॅन ऑफ द सीरीज पुरस्कारचा मानकरी ठरला.

ही मालिका रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या करिअरमधील शेवटची मालिका असू शकते. अशा चर्चांनी इंटरनेटवर आधीच धुमाकूळ घातला होता. त्यातच आता रोहित शर्माने मायदेशी परतण्याआधी सोशल मीडीयावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

रोहित शर्माचा वनडे क्रिकेटला रामराम?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर रोहित शर्मा मायदेशी परतला आहे. घरी परतण्यापूर्वी त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर आणि एक्स अकाउंटवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने सिडनी विमानतळावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो बॅकपॅक घेऊन चालत आहे. या फोटोला कॅप्शन दिले की, 'One last time, signing off from Sydney' म्हणजेच ही शेवटची वेळ, सिडनी अलविदा... या कॅप्शनने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

ही पोस्ट सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमधून हे स्पष्ट होत आहे की, रोहितचा हा ऑस्ट्रेलिया दौऱा शेवटचा होता. तसेच याला रोहित वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहे. तिसरा वनडे सामना जिंकल्यानंतर रोहितने म्हटले होते की, 'आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला खेळायला येईन की नाही याची खात्री नाही, परंतु येथे जेवढं काही खेळलो त्याचा आनंद मोठा आहे'.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हिटमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने पर्थ वनडेमध्ये फक्त ८ धावा केल्या, तर अॅडिलेड वनडेमध्ये ७३ धावांची अर्धशतकीय खेळी केली. तिसऱ्या आणि शेवटच्या सिडनी वनडे सामन्यात नाबाद १२१ धावा करत दमदार शतक झळकावले. यासह रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण केली आहेत. त्याने संपूर्ण मालिकेत २०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT