Rohit Sharma Update/Social media saam tv
Sports

MI vs LSG : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट; मुंबई इंडियन्सनं घेतला निर्णय

Rohit Sharma Update : दुखापतीमुळं मागील बऱ्याच सामन्यांपासून बाकावर बसलेला रोहित शर्मा लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना आहे. रोहित शर्माच्या खेळण्याबाबत मुंबई इंडियन्सनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात खेळायचं की नाही, याचा निर्णय व्यवस्थापनानं त्याच्यावरच सोपवला आहे.

Nandkumar Joshi

आयपीएल २०२६ चा ४७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज, सोमवारी होत आहे. या सामन्याआधीच रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली आहे. रिपोर्ट्सनुसार, लखनऊविरुद्धच्या सामन्यात खेळायचं किंवा नाही याबाबतचा निर्णय मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मावरच सोपवला आहे. त्यामुळे आता खेळायचं की नाही हे रोहित शर्मालाच ठरवावं लागणार आहे.

मुंबई इंडियन्सला कर्णधारपदी असताना पाच ट्रॉफी जिंकून देणारा आणि संघाचा कणा म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळं त्रस्त आहे. मागील काही सामन्यांपासून तो प्लेइंग ११ मध्ये नाही. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळं तो सध्या खेळत नाही. मागील दोन ते तीन सामन्यात तो खेळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आज, सोमवारी लखनऊविरुद्ध महत्वाचा सामना होत आहे.

या सामन्यात रोहित मैदानात उतरणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या आधी रोहितची फिटनेस टेस्ट होणार असल्याचे रिपोर्ट्स आहेत. रोहित शर्मा फिट असेल तर तो आजच्या सामन्यात खेळू शकतो, असे सांगितले जात आहे.

नेटमध्ये कसून सराव

मुंबई इंडियन्ससाठी चांगली बाब म्हणजे रोहित शर्माने नेटमध्ये कसून सराव केला आहे. त्यामुळे तो आज खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, लखनऊ सुपर जायंट्सविरोधात खेळायचं की नाही याचा निर्णय स्वतः रोहित शर्मालाच घ्यावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनानं हा निर्णय रोहितवर सोपवल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले.

रोहित शर्मा खेळल्यास संघात होणार बदल

रोहित शर्मा जर आजच्या सामन्यात खेळला तर, मुंबई इंडियन्ससाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता आहे. रॉबिन्स मिन्ज याला बाकावर बसावं लागेल. रोहितचा संघात समावेश झाला तर, फलंदाजी क्रमातही बदल होऊ शकतो. रोहित शर्मा आणि रिकल्टन हे दोघे सलामीला येण्याची शक्यता असून, विल जॅक्स हा फर्स्ट डाउनला फलंदाजीला उतरू शकतो.

रोहित शर्माच्या ४ सामन्यांत १३७ धावा

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स आतापर्यंत ९ सामने खेळला आहे. त्यातील फक्त ४ सामन्यांत रोहित शर्मा खेळला आहे. म्हणजेच गेल्या पाच सामन्यांत तो संघात नाही. रोहितने चार सामन्यांत १६५.०६ च्या स्ट्राइक रेट आणि ४५ हून अधिकच्या सरासरीने १३७ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT