rohit sharma with babar azam google
Sports

Rohit Sharma Record: T20I क्रिकेटमध्ये रोहित शर्मा रचणार इतिहास! बाबर आझमचा मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी

Rohit Sharma Can Break Babar Azam Record: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला बाबर आझमचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्माकडे मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. मोठ्या रेकॉर्डमध्ये तो लवकरच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे सोडणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ३ सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.

रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी..

रोहित शर्माने आतापर्यंत ५७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाने ४४ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर १२ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १ सामना बरोबरीत सुटला आहे. तर बाबर आझमचा रेकॉर्डचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना पाकिस्तानने ८४ सामने खेळले आहेत.

यादरम्यान पाकिस्तानने ४७ सामने जिंकले आहेत. तर २९ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. १ सामना बरोबरीत राहिला तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा रेकॉर्ड हा बाबर आझमच्या नावावर आहे.दरम्यान लवकरच रोहित शर्मा हा रेकॉर्ड मोडून काढू शकतो.

कसा मोडला जाईल बाबर आझमचा रेकॉर्ड?

भारतीय संघाला जर फायनलमध्ये पोहोचायचं असेल, तर इथून पुढे अजून ६ सामने खेळावे लागतील. साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर सुपर ८ मध्ये भारतीय संघाला ३ सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सामना होणार आहे. रोहितला बाबर आझमचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ४ सामने जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT