Rohit Sharma captain of the ICC Mens T20I Team of the Year 2024 saam tv
Sports

रोहित शर्मा जगात भारी! ICCच्या 'T20 टीम ऑफ द इअर'चा कॅप्टन; ३ भारतीयांनाही सन्मान

ICC Men's T20I Team of the Year 2024 Captain Rohit Sharma : भारताला टी २० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला आयसीसीनं मोठा सन्मान दिला आहे. टी २० टीम ऑफ द इअर संघाच्या कर्णधारपदी त्याची निवड केली आहे.

Nandkumar Joshi

आयसीसीनं शनिवारी २०२४ मधील पुरुष टी २० टीम ऑफ द इअरची घोषणा केली. थोडक्यात आयसीसीच्या २०२४ च्या टी २० संघाची घोषणा झालीय. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आलं आहे. आयसीसीच्या या संघात रोहित शर्मासह चार भारतीयांनाही स्थान देण्यात आलं आहे हे विशेष.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं २०२४ चा टी २० वर्ल्डकप जिंकला होता. साल २०२४ च्या सर्वोत्तम टी २० संघांमध्ये भारताचाच दबदबा होता. रोहितच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकून भारतीय संघ विश्व चॅम्पियन ठरला होता. त्यामुळंच आयसीसीच्या टी २० टीम ऑफ द इअरच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे.

४ भारतीय खेळाडू कोण?

रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असणार आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त इतर तीन खेळाडूंना या संघात स्थान दिलं आहे. तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग हे या संघात आहेत. बाबर आझम या एकमेव पाकिस्तानी खेळाडूला या संघात स्थान देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या संघांचा एकेक खेळाडू या संघात आहे. वेस्ट इंडीजच्या निकोलस पुरनला विकेटकीपर म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे.

रोहित शर्माच्या ३७८ धावा

रोहित शर्मा टी २० टीम ऑफ द इअरचा कर्णधार तर आहेच, शिवाय सलामीवीर म्हणून त्याला स्थान देण्यात आलंय. रोहितने गेल्या वर्षी ११ टी २० सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने आणि १६० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने ३७८ धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकून ११ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मानं टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. सध्या तो भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. तर दुसरीकडे बुमराहने २०२४ मध्ये ८ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ८.२६ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या. भारताला विश्वकप जिंकून देण्यात बुमराहचा मोठा वाटा होता. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी होता.

अर्शदीपची चमकदार कामगिरी

हार्दिक पंड्याने गेल्या वर्षी १७ टी २० सामन्यांत ३५२ धावा केल्या होत्या. तर १६ विकेट्सही घेतल्या होत्या. टी २० वर्ल्डकप स्पर्धेत त्यानं मोलाची भूमिका बजावली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात षटकात १६ धावा डिफेंड केल्या होत्या. तर अर्शदीप सिंग हा टी २०मध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे.

अर्शदीप सिंग यानं १८ सामन्यांत १३.५० च्या सरासरीनं ३६ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी २० वर्ल्डकपमध्ये ८ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्यात. पाकिस्तानचा फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम यानं गेल्या वर्षी २४ टी २० सामन्यांत ७३८ धावा केल्या आहेत. त्यात सर्वाधिक ७५ धावांचा समावेश होता. तर सहा अर्धशतके केली होती.

२०२४ पुरुष टी २० टीम ऑफ द इअर :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, ट्रॅविस हेड, फिल सॉल्ट, बाबर आझम, निकोलस पुरन (विकेटकीपर), सिकंदर रजा, राशिद खान, वानिंदू हसरंगा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT