Rohit sharma saam tv
Sports

Rohit Sharma Record: हिटमॅनचा नादखुळा! शतक पूर्ण करताच मोडला सेहवाग अन् गावसकरांचा 'हा' मोठा रेकॉर्ड

IND vs WI 1st Test: लंच ब्रेक झाल्यानंतर रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले.

Ankush Dhavre

Rohit Sharma Century: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जयस्वालसह कर्णधार रोहित शर्माने देखील जोरदार शतक झळकावले आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक झाल्यानंतर रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक पूर्ण केले.

रोहित शर्माचे या वर्षातील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने खणखणीत शतक झळकावले होते. नागपूरच्या मैदानावर खेळताना त्याने १२० धावांची खेळी केली होती. यापूर्वी २०१३ मध्ये त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. हे त्याचे परदेशात खेळताना दुसरे शतक आहे. तर वेस्टइंडीजमध्ये खेळताना हे त्याचे पहिलेच शतक आहे.

वीरेंद्र सेहवाग अन् सुनील गावसकरांचा मोडला रेकॉर्ड..

या शतकी खेळीसह रोहित शर्माने वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकरांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने ५० धावांचा पल्ला गाठताच वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकरांचा सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १०२ वेळेस ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. तर वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकरांनी १०१ वेळेस हा कारनामा केला होता. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानी आहे. सचिनने १२० वेळेस हा कारनामा केला आहे. (Latest sports updates)

गेल्या ३९ डावात दुसरे शतक..

रोहित शर्माने गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गेल्या ३९ डावातील हे त्याचे कसोटीतील दुसरे शतक आहे. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये ४४ शतकांसह सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ५ व्या स्थानी पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT