rohit sharma twitter
Sports

IND vs BAN: केएल राहुलचं कसोटी संघात कमबॅक कसं झालं? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

IND vs BAN 1st Test, Rohit Sharma On KL Rahul: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने केएल राहुलला बॅक केलं आहे.

Ankush Dhavre

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, रोहितने काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. बांगलादेशविरुद्ध होणारी कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी रंगीत तालीम नसेल, भारतासाठी प्रत्येक सामना हा महत्वाचा असणार आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. यासह त्याने केएल राहुलला संघात घेण्याचं कारणही सांगितलं आहे.

केएल राहुल हा उत्तम फलंदाज आहे. त्याने परदेशात खेळताना भारतीय संघासाठी काही महत्वपूर्ण खेळ्या केल्या आहेत. मात्र त्याला आपल्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवून ठेवता आलेलं नाही. त्यामुळे अनेकदा त्याला संघात स्थान देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मात्र रोहित त्याला बॅक करताना दिसून आला आहे.

केएल राहुल क्वालिटी फलंदाज आहे. राहुलने जेव्हापासून कमबॅक केलंय तेव्हापासून त्याने दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावलं आहे. हैदराबादमध्येही खेळताना त्याने ८० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. असं काहीच कारण नाहीये, ज्यावरुन आपण म्हणू शकतो की, तो कसोटी संघात फिट बसत नाही.' अस रोहित शर्मा म्हणाला.

युवा खेळाडूंचं केलं कौतुक

रोहितने पत्रकार परिषदेत बोलताना युवा खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, ' 'सरफराज, जयस्वाल, जुरेल यांना तयार करावं लागणार आहे. हे सर्व खेळाडू युवा आहेत आणि निडर आहेत. त्यांनी कठीण परिस्थितीत संघासाठी धावा केल्या आहेत. जयस्वालची आत्तापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. ध्रुव जुरेलनेही यष्टीरक्षक म्हणून दमदार कामगिरी केली आहे आणि संघ अडचणीत असताना धावा केल्या आहेत. सर्फराज निर्भीड आहे.'

कसोटी मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT