team india saam tv
क्रीडा

Team India Playing 11: टीम इंडियाच्या कसोटी संघात मोठा बदल! रोहितसह 'हा' फलंदाज करणार डावाची सुरूवात

Ankush Dhavre

Cheteshwar Pujara Replacement: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये भारतीय संघाचा सराव सामना सुरू आहे. या सराव सामन्यात भारतीय संघाकडून नवी सलामी जोडी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे.

सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांची जोडी मैदानावर उतरली होती. तर चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकाची जागा भरून काढण्यासाठी शुभमन गिलला संधी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार कामगिरी करत अर्धशतकी खेळी केली आहे.

शुभमन गिल जर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला तर भारतीय संघाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. कारण या मालिकेत चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) संधी दिली गेली नाही. यशस्वी जयस्वाल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना दिसून आला आहे.

त्यामुळे त्याला हवं त्याच ठिकाणी खेळता येईल. तर दुसरीकडे शुभमन गिल चेतेश्वर पुजाराची जागा भरून काढू शकतो. तसेच विराट कोहली चौथ्या आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल. (Latest sports updates)

भारत- वेस्ट इंडिज कसोटी मालिका ही अतिशय महत्वाची असणार आहे. कारण या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. यावरून असं दिसून येतं की, बीसीसीआय आता संघातील दिग्गज खेळाडूंचा पर्यायी खेळाडू शोधण्याच्या विचारात आहे. जर यशस्वी जयस्वालला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली, तर तपुजाराची जागा भरून काढायला गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल.

केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार संधी?

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये १२ जुलैपासून पहिला कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशन आणि केएस भरत हे २ पर्याय आहेत. केएस भरतला संधी मिळूनही हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता आक्रमक फलंदाज ईशान किशनला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT