Rohit Sharma 20000 Elite club saam tv
Sports

रोहित शर्मानं इतिहास रचला! सचिन तेंडुलकर-विराटच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Rohit Sharma History : दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला. रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Nandkumar Joshi

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा यानं इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत रोहितनं एक मोठा पल्ला गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने २०००० धावा केल्या आहेत. रोहित हा अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला असून, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या स्पेशल क्लबमध्ये त्यानं एन्ट्री घेतली आहे.

विशाखापट्टणममधील वनडे सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीला आला. त्यांनी ४७.५ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. हे आव्हान घेऊन भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मैदानात आले. रोहितने आपल्या खेळीतील २७ धावा पूर्ण केल्या आणि त्यानं आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एक मोठा टप्पा गाठला. त्यानं २०००० धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांच्या एका स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री केली.

रोहितच्या २० हजार धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने २७ धावा केल्या आणि यासह त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०००० धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा हा टप्पा पार करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली या भारतीय खेळाडूंनी २०००० धावा केल्या आहेत. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ४३०१ धावा केल्या आहेत. तर टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२३१ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये ११ हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू

सचिन तेंडुलकर - ३४३५७

विराट कोहली - २७९१० (अजूनही खेळत आहे.)

राहुल द्रविड - २४०६४

रोहित शर्मा - २००१८ (अजूनही खेळत आहे...)

सौरव गांगुली - १८४३३

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज म्हणून रोहित शर्माची ओळख आहे. याच रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील १४ वा खेळाडू ठरला आहे. ५३८ डावांमध्ये त्यानं हा पल्ला गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्यानं एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलं आहे. तो सध्या १३ व्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितने आतापर्यंत ५० शतके ठोकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, एकनाथ शिंदेंनी बडा नेता फोडला

Corporation Election: 'पक्षात काम करून काय फायदा? ठाण्यानंतर वर्सोव्यात शिंदे सेनेला मोठा धक्का; निष्ठावंतानेच पुकारलं बंड

Maharashtra Live News Update : सोलापुरात भाजप - आरपीआय युती अखेर तुटली, सन्मानजनक जागा न मिळाल्याने आठवले गटाचा निर्णय

'AB फॉर्म' म्हणजे काय?

Viral Video : एअर इंडियाच्या विमानात किळसवाणा प्रकार, प्रवाशाची सहकारी प्रवाशावर लघुशंका, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT