MS Dhoni Quits Captaincy  Saam Tv
क्रीडा

MS Dhoniने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित इमोशनल; सोशल मीडियावर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Bharat Jadhav

MS Dhoni Quits Captaincy Fan Comments On Social Media :

इंडियन प्रीमियर लीगसाठी भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत. आयपीएलची सुरुवात होण्याआधी मोठी सीएसकेच्या संघात मोठी घडामोड झालीय.चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी कर्णधार आणि चाहत्यांचा आवडता महेंद्रसिंग धोनीने संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय.(Latest News)

महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्याने चाहत्यांपासून क्रिकेटच्या दिग्गजांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला. आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलीय. रोहित शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक खास फोटो पोस्ट करून धोनीचे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडल्याची स्टोरी शेअर केलीय. धोनी आणि रोहित शर्मा एकमेकांना हस्तांदोलन करत असल्याचा फोटो शेअर केलाय.

रोहित शर्मा ज्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता आणि महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता. त्यावेळी दोघांना एकमेकांना हस्तांदोलन केले होते.सोशल मीडियावर चाहत्यांनी देखील धोनीचे फोटो शेअर करत या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.एमएस धोनीच्या या निर्णयानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर कमेंट्साचा पाऊस पडत आहे.

एमएस धोनीने आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. ऋतुराज २०१९ पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग आहे आणि त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय. या कालावधीत आयपीएलमध्ये त्याने ५२ सामने खेळले आहेत, असं चेन्नई सुपर किंग्जने अधिकृत प्रेस रिलीज मध्ये म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT