भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल हा मागील काही दिवसांपासून चर्चत आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये मैदानातल्या खेळाडूंपेक्षा चहलच्या नावाची चर्चा सुरु होती. याला कारण होतं आरजे महावश. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पाहण्यासाठी युजवेंद्र चहल आरजे महावशसह दुबईला पोहोचला होता. तेव्हापासून ते दोघे डेट करत असलेल्या चर्चांना उधाण आले.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशात चहल आरजे महावशसोबत मॅच पाहायला गेला. त्यामुळे धनश्रीनंतर आता युजवेंद्र चहल महावशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला. याच दरम्यान आरजे महावशच्या एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
आरजे महावशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. तिला एका अवॉर्ड शोमध्ये बेस्ट मेगा इन्फ्लुएंसर हा अवॉर्ड मिळाला असल्याचे या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने 'छोट्या महावशला आज या महावशचा अभिमान वाटेल आणि हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे! तुम्ही फक्त तुमचे काम करत राहा. कोणाचं वाईट करु नका, वाईट ऐकू नका' असे म्हटले आहे.
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यामध्ये आरजे महावशचे इन्स्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोवर्स होते. ज्यावेळेस ती युजवेंद्र चहलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, तेव्हापासून तिच्या फॉलोवर्समध्ये वाढ झाली आहे. आता आरजे महावशचे इन्स्टाग्रामवर एकूण २.३ मिलियन फॉलोवर्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.