lucknow supe giants saam tv
Sports

IPL 2025: लखनऊचा नवा कर्णधार ठरला! या स्टार भारतीय खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब

Rishabh Pant Named As Captain Of Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्स संघाने आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सने मोठी जबाबदारी दिली आहे. रिषभ पंतची लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे संघमालक संजीव गोयंका यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. संजीव गोयंका यांच्या मते रिषभ पंत हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार असेल.

आयपीएल २०२४ स्पर्धेत केएल राहुल या संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र त्याने आगामी हंगामापूर्वी लखनऊची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलची रिप्लेसमेंट म्हणून रिषभ पंतला संघात घेतलं आणि आता त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लखनऊला रिषभ पंतसारख्या अनुभवी कर्णधाराची गरज होती. पंत ही कमतरता भरुन काढू शकतो.

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्सने सर्वात मोठी बोली लावत रिषभ पंतला आपल्या संघात स्थान दिलं होतं. पंतवर तब्बल २७ कोटींची बोली लागली.यापूर्वी या स्पर्धेच्या इतिहासात इतकी मोठी बोली कुठल्याही खेळाडूवर लावली गेली नव्हती.

पंतवर बोली लागण्यापूर्वी श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. अय्यरवर २६.७५ कोटींची बोली लागली होती. अवघ्या काही मिनिटात पंतवर २७ कोटींची बोली लागली आणि हा रेकॉर्ड मोडला गेला.

रिषभ पंत लिलावात येताच सर्व संघांनी त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी पूर्ण जोर लावला. पंतची मुळ किंमत १० कोटी रुपये इतकी होती. सुरुवातीला लखनऊ आणि आरसीबी यांच्यात चुरशीची लढत रंगली. त्यानंतर हैदराबादनेही बोली लावली. पण लखनऊने माघार घेतली नव्हती. पंतची बोली जेव्हा श्रेयस अय्यरच्या जवळ पोहोचला. त्यावेळी लखनऊने दिल्लीला २७ कोटींची ऑफर दिली. मात्र दिल्लीने नकार दिला आणि रिषभची दिल्लीमध्ये एन्ट्री झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

SCROLL FOR NEXT