rishabh pant saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया चषकापूर्वी रिषभ पंतची टीम इंडियात एन्ट्री! Photo होतोय व्हायरल

Ankush Dhavre

Rishabh Pant Latest News:

भारतीय संघातून बाहेर असलेल्या रिषभ पंतची सध्या पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. येत्या ३० ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

या स्पर्धेपूर्वी तो सायकल चालवताना दिसून आला आहे. तसेच त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

आगामी आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणार आहे. पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

तर भारतीय संघ २ सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.\

भारतीय खेळाडूंची घेतली भेट..

भारतीय संघाचे सराव शिबिर कर्नाटकच्या अलुरमध्ये पार पडले. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रिषभ पंतने आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

या फोटोमध्ये तो NCA मध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारताना दिसून येत आहे. आशिया चषकासाठीचं सराव शिबिर संपन्न झालं असून आता भारतीय संघ श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे.

गेल्या वर्षी झाला होता अपघात...

रिषभ पंत हा दिल्लीकडून रुडकीच्या दिशेने जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्याच्यावर देहराडुनच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत शिफ्ट केलं गेलं होतं.

त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला स्वत:च्या पायावर चालता देखील येत नव्हतं.

मात्र आता तो रिकव्हर होत असुन काही महिन्यात मैदानात खेळताना दिसुन येऊ शकतो. (Latest sports updates)

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT