टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंत हा कार अपघातात जखमी झाला होता. अपघातात जखमी झाल्यामुळे ऋषभ पंतला आयपीएल २०२३ आणि विश्वचषकात खेळता आलं नाही. त्यानंतर आता ऋषभ पंतबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. ऋषभ पंत लवकरच मैदानावर फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे, असं वृत्त हाती आलं आहे. (Latest Marathi News)
Cricbuzz रिपोर्टनुसार, ऋषभ पंत अपघातानंतर आता पूर्णपणे फिट झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता शक्यता आहे की, तो यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामात खेळताना दिसणार आहे.
ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स नेतृत्व करताना दिसणार आहे. पंतचा सध्या बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीमध्ये सराव सुरु आहे. ऋषभ पंत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण फिट होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ऋषभ पंतचा गेल्या वर्षी कार अपघात झाला. या अपघातात त्याच्या पाठीला दुखापत झाली. या अपघातानंतर ऋषभवर शस्त्रक्रिया झाली. मात्र, आता Cricbuzz रिपोर्टनुसार दिल्ली कॅपिटल्सकडून संकेत मिळाले आहे की, बीसीसीआयकडून मंजुरी मिळाल्यास ऋषभ पंत यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळू शकतो. तो आयपीएलमध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे.
भारताने २०२३ साली जानेवारी ते आतापर्यंत ६२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी एकही सामना ऋषभ पंतने खेळला नाही. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजमध्येही पंत खेळण्याची शक्यता कमी आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.