rishabh pant
rishabh pant  saam tv
क्रीडा | IPL

Rishabh Pant Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या कमबॅक बाबत मोठी अपडेट आली समोर

Ankush Dhavre

Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये येत्या ७ ते ११ जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात आशिया चषक तर त्यानंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. दरम्यान आता रिषभ पंतच्या कमबॅकबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी..

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी अपघात झाला होता. तेव्हापासून त्याची रिकव्हरी प्रोसस सुरु आहे. त्याच्या बाबत अशा अनेक अफवा उठल्या आहेत की, त्याच्यावर २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र बीसीसीआयच्या एका सूत्राने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, 'मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, रिषभ पंतवर कुठलीही शस्त्रक्रिया करण्यात आली नाहीये. या सर्व अफवा आहेत. दर २ आठवड्यानंतर त्याची पाहणी केली जात आहे. तो वेळेच्या आधीच रिकव्हर होतोय. याचा अर्थ असा की, तो लवकरच कमबॅक करू शकतो.' (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंतशिवाय खेळणार भारतीय संघ..

भारतीय संघातील खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघाला रिषभ पंतची कमतरता जाणवू शकते. गेल्या काही वर्षांपासून त्याने भारतीय संघासाठी जोरदार कामगिरी केली आहे. तो संघाबाहेर झाल्यानंतर अजूनही भारतीय संघाला त्याचा रिप्लेसमेंट मिळू शकला नाहीये.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anjali Arora : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा साकारणार सीता मातेची भूमिका

Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

Baramati Lok Sabha: बारामतीकरांना ४ जूनला गोड बातमी मिळेल; आमदार रोहित पवारांना विश्वास

Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Baramati News | EVM वर कमळाचं चिन्हच नाही, बारामतीचे आजोबा संतापले

SCROLL FOR NEXT