Rishabh Pant  X
Sports

'अरे धोनीला एकदा कॉल कर..' वीरुचा रिषभ पंतला मायेचा सल्ला; ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, 'किपिंग सोड..'

Rishabh Pant News : आयपीएल २०२५ मध्ये रिषभ पंतने खराब कामगिरी केली आहे. पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यात तो १८ धावांवर माघारी परतला. खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी दिग्गज खेळाडूंनी रिषभला उपाय सुचवले आहेत.

Yash Shirke

IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतला २७ कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात सामील केले. संघाचे नेतृत्त्व देखील पंतकडे सोपवण्यात आले. आयपीएल २०२५ मधला सर्वात महागडा खेळाडू म्हणून पंत मैदानात उतरला होता. रिषभ पंतकडून सर्वांना खूप जास्त अपेक्षा होता. पण चाहत्यांचा अपेक्षाभंग होत असल्याचे पाहायला मिळते. यंदाच्या सीझनमध्ये पंतने ११ सामन्यांमध्ये १२.८ च्या सरासरीने आणि ९९ च्या स्ट्राईक रेटने फक्त १२८ धावा केल्या आहेत. पंजाब विरुद्ध लखनऊ सामन्यामध्ये तो १८ धावांवर बाद झाला.

रिषभ पंतच्या खराब कामगिरीवर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. वीरेंद्र सेहवाग पंतला फॉर्ममध्ये येण्यासाठी एमएस धोनीशी कॉल करुन चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्याकडे फोन आहे, त्याला हवं तर तो कुणालाही कॉल करु शकतो, कुणाशीही चर्चा करु शकतो. जर त्याला वाटत असेल की, त्याला मानसिकदृष्ट्या योग्य विचार करता येत नाहीये, तर त्याला मदत करणारे अनेक क्रिकेटपटू आहेत. जर तो धोनीला आपला आदर्श मानत असेल, तर त्याने धोनीशी बोलावे, असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

पंजाब किंग्स विरद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्याचे विश्लेषण करताना वीरेंद्र सेहवागने पंतला खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या. रिषभ पंतने त्याच्या फलंदाजीचे जुने व्हिडीओ पाहायला हवेत. ज्या इनिंग्समध्ये त्याने धावा केल्या आहेत, त्याच्या व्हिडीओ पाहाव्यात. दुखापतीनंतर पंतच्या खेळावर परिणाम झाला आहे, असे वक्तव्य वीरेंद्र सेहवागने केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲरॉन फिन्चनेही पंतला खेळी सुधारण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.

'विकेटकीपिंग करताना संघाचे नेतृत्त्व करणे अवघड असते. ओव्हर्सदरम्यान तुम्हाला तुमच्या गोलंदाजांशी बोलण्यासाठी काहीच सेकंद मिळतात. स्टॉप-क्लॉन नियमानुसार, तो खूप कमी वेळ मिळतो. गोलंदाज प्रत्येक चेंडूनंतर प्लान बदलू शकतो. अशा वेळी गोलंदाजांशी चर्चा करता येत नाही. अशा वेळी रिषभ पंतने निकोलस पूरनला विकेटकिपिंगची जबाबदारी द्यावी आणि स्वत: पूर्णपणे नेतृत्त्वावर लक्ष द्यावे', असे वक्तव्य ॲरॉन फिन्चने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT