Rishabh Pant Car Accident SAAM TV
Sports

Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर NHAI ची झोपच उडाली; रात्रीत खड्डे गायब

Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतचा अपघात कसा झाला? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.

Nandkumar Joshi

Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतचा अपघात कसा झाला? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. काही कारणं हळूहळू उघड होऊ लागली आहेत. त्यात हायवेवरील खड्ड्यामुळं अपघात झाल्याचं वृत्त धडकलं आणि NHAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण खडबडून जागं झालं. एनएचएआयनं तात्काळ कार्यवाही करून घटनास्थळाच्या रस्त्यावरील सर्व खड्डे एका रात्रीत बुजवून टाकले. रिषभ पंतचा अपघात मागील शुक्रवारी झाला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रिषभ पंतच्या जबाबाच्या आधारे डुलकी लागल्याने अपघात झाल्याचे उत्तराखंड पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, रिषभ पंतने रस्त्यावरील खड्ड्यामुळं अपघात झाल्याचं सांगितलं, अशी माहिती डीडीसीएच्या संचालकांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतल्यावर दिली आहे. (Latest Marathi News)

रिषभ पंतचा अपघात खड्ड्यामुळं...

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रिषभ पंतची भेट घेतल्यानंतर रुग्णालयाबाहेरच माध्यमांशी संवाद साधला. रस्त्यावर काही खड्डे होते, रात्रीच्या अंधारात आधी ते दिसले नाहीत. अचानक खड्डे नजरेस पडले, ते चुकवण्याच्या नादात कार दुभाजकाला धडकली, असे रिषभ पंत म्हणाल्याचे धामी यांनी सांगितले. (Rishabh Pant)

स्थानिकांचं म्हणणंही तेच...

पंतच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी हायवेवरील खड्ड्यांचा उल्लेख केला. येथील स्थानिकांनीही खड्डे हेच अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. याच ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत आणि त्यात अनेकांनी जीव गमावल्याचंही स्थानिकांचे म्हणणे आहे.

एनएचएआयने रात्रीत खड्डे बुजवले

दरम्यान, आतापर्यंत या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पण रिषभ पंतच्या अपघातानंतर खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर प्राधिकरणाने एका रात्रीत खड्डे बुजवून टाकले. रस्त्यावर खड्डेच नव्हते असा बदल झाला आहे. तसेच या अपघातात जे रेलिंग तुटले होते, तेही दुरुस्त करण्यात आले आहे.

रिषभ पंतच्या भेटीसाठी गर्दी

रिषभ पंतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या भेटीसाठी रुग्णालयात लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे रिषभ पंतला पुरेशी विश्रांतीही मिळत नाही. रिपोर्ट्सनुसार, पंतची भेट घेण्याचे लोकांनी टाळावे, जेणेकरून त्याला पुरेशी विश्रांती घेता येईल, असे आवाहन रुग्णालयातील मेडिकल स्टाफनं केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT