Rishabh Pant News Saam Tv
क्रीडा

Rishabh pant : पहिल्यांदा असं झालेलं नाही; क्रिकेटपटू ऋषभ पंत का भडकला? नेमकं काय घडलं? वाचा

rishabh pant reaction on fake news : क्रिकेटपटू ऋषभ पंत हा अफवा पसरवणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात चांगलाच भडकला आहे. ऋषभने सोशल मीडियावर पोस्ट लिहित अफवा पसरवणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : क्रिकेटपटू ऋषभ पंतने सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेटपटूने सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्या काही नेटकऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. ऋषभ पंतला आरसीबीचं कर्णधार व्हायचं आहे. त्याचा मॅनेजने आरसीबीच्या मालकाशी संपर्क केल्याची खोटी अफवा सोशल मीडियावर वाऱ्यागत पसरली आहे. या खोट्या अफवेनंतर ऋषभ पंतचा पारा चांगलाच चढला. त्याने खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवणाऱ्या नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने ६३४ दिवसानंतर कसोटी सामन्यात पुन्हा पदार्पण केलं आहे. बांगलादेशाविरोधात पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलंय. ऋषभने शतक ठोकल्याने तो आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचलाय. तर आता पंत कानपूरमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. याचदरम्यान, ऋषभ पंतची एक्सवर पोस्ट चर्चेत आली आहे.

'फेक न्यूज. तुम्ही सोशल मीडियावर खोट्या अफवा का पसरवत आहात? थोडं शहाणपण दाखवा. काही कारण नसताना खोटी अफवा पसरवत आहात. पहिल्यांदा असं झालेलं नाही. तसंच हे शेवटचंही होणार नाही. काही लिहिण्याची आधी अधिकृत माहिती जाणून घ्यायची होती. दर दिवसाला चुकीच्या बाबी समोर येताय. हा मेसेज खोट्या अफवा पसरवणाऱ्या लोकांसाठी होता, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rishabh pant

दरम्यान, 'एक्स'वर राजीव नावाच्या युजर्स हँडलने लिहिलं होतं की, 'पंतच्या मॅनेजरने आसीबीचं कर्णधार होण्यासाठी बोलणं केलं आहे. मात्र, आरसीबीच्या व्यवस्थापनाने त्याला नकार दिला आहे. तसेच या पोस्टमध्येही असाही दावा करण्यात आला आहे की,'विराट कोहली हा ऋषभला संघात घेऊ इच्छित नाही'. मात्र, पंतने या वृत्ताचं खंडन केलं आहे.

ऋषभ पंतने चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात १२८ चेंडूत १०९ धावा केल्या होत्या. त्याने कसोटी सामन्यात यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीच्या कसोटी सामन्यातील ६ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघातून खेळतो. कार अपघातानंतर त्याने बऱ्याच काळानंतर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT