KKR vs SRH Match Result Saam TV
Sports

KKR vs SRH Highlight: रिंकू आजही लढला, पण एकटा पडला; रोमांचक सामन्यात हैदराबादचा विजय

KKR vs SRH Match : केकेआरकडून रिंकू सिंगने शेवटपर्यंत झुंज दिली. रिंकू सिंगने ३१ चेंडूत धावा ५८ कुटल्या. आपल्या शानदार खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

Satish Daud

KKR vs SRH Match Highlight : आयपीएलमध्ये आज सनराईज हैदराबाद आणि कोलकता संघात रोमांचक सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात हैदराबादने केकेआरचा २३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने केकेआरपुढे विजयासाठी २२९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २० षटकात ७ बाद २०५ धावाच करू शकला. (Latest sports updates)

केकेआरकडून रिंकू सिंगने शेवटपर्यंत झुंज दिली. रिंकू सिंगने ३१ चेंडूत धावा ५८ कुटल्या. आपल्या शानदार खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. मात्र, आज तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.

ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावरप्लेमध्ये त्याचा हा निर्णय काही प्रमाणात गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठीला झटपट माघारी पाठवलं. मात्र, त्यानंतर हॅरी ब्रुकने एडम मार्करमच्या साथीने कोलकाताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Latest Marathi News)

सलामीवीर हॅरी ब्रुकने दमदार शतक झळकावलं. त्याला कर्णधार एडम मार्करमने ५० धावांची खेळी करत चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकांत अभिषेक शर्मा १७ चेंडूत ३२ धावा आणि क्लासेनने ६ चेंडूत केलेल्या १६ धावांच्या जोरदार फटकेबाजीमुळे हैदराबादला २२९ धावा करता आल्या. हॅरी ब्रुक ५५ चेंडूत १०० धावा काढून नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. 

दरम्यान, हैदराबादने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात गुरबाज शून्यावर बाद झाला. भुवनेश्वर कुमार याने गुरबाजचा अडथळा दूर केला. त्यानंतर वेंकटेश अय्यर यालाही मोठी खेळी करता आली नाही. वेंकटेश अय्यर १० धावांवर बाद झाला. सुनील नारायण याला खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय आंद्रे रसेल याला मोठी खेळी करता आली नाही. रसेल तीन धावांवर बाद झाला.

नारायण जगदीशन याने ३६ धावांचे योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला कर्णधार नीतीश राणा याने धावांचा पाऊस पाडला. नीतीश राणा याने ४१चेंडूत ७५ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने ६ षटकार आणि ५ चौकार लगावले. तर रिंकू सिंह याने पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी केली. रिंकू सिंह याने ३१ चेंडूत ५८ धावांचे योगदान दिले. (IPL 2023)

रिंकू आणि नीतीश राणा फलंदाजी करत असताना कोलकाताला विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी नटराजन याने नीतीश राणा याला बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरही १२ धावांवर तंबूत परतला. रिंकू सिंह याने ५८ धावांची नाबाद खेळी केली. रिंकू आणि नीतीश राणा यांनी वादळी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे कोलकात्याला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. 

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT