Rinku Singh Secret Shares/PTI SAAM TV
Sports

Rinku Singh Secret Shares : रिंकू सिंहच्या 'पॉवरफुल्ल' बॅटिंगचं सीक्रेट काय?; कॅमेऱ्यासमोर स्वतःच सांगून टाकलं!

Rinku Singh Hits 100 m Six : टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसे काढणारा भारताचा स्टार युवा फलंदाज रिंकू सिंह याने त्याच्या 'पॉवरफुल्ल' खेळीमागचं सीक्रेट स्वतःच उलगडलं आहे.

Nandkumar Joshi

Rinku Singh reveals secret behind his 100 meter Six :

टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसे काढणारा भारताचा स्टार युवा फलंदाज रिंकू सिंह याने त्याच्या 'पॉवरफुल्ल' खेळीमागचं सीक्रेट स्वतःच उलगडलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेत बहारदार फलंदाजीनं रिंकू सिंहनं क्रिकेट चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. दबावातही शांत आणि संयमी खेळीचं श्रेय त्याने आयपीएलला दिलं आहे. वजनाबाबत सराव आणि ट्रेनिंग घेत असल्यानं उत्तुंग फटके खेळण्यास मदत होते, असं रिंकू म्हणाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिंकूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी २० सामन्यात अवघ्या २९ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४६ धावांची स्फोटक खेळी केली. या विजयात रिंकूचा मोठा वाटा होता.

रिंकूसह जितेशचीही स्फोटक खेळी

रिंकू सिंह याने स्फोटक फलंदाजी केलीच, पण नवख्या जितेश शर्मानंही तडाखेबंद फटकेबाजी करून सगळ्यांचे लक्ष वेधले. त्याने अवघ्या १९ चेंडूंत ३५ धावा केल्या. भारतानं पाहुण्या ऑस्ट्रेलियासमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करत ऑस्ट्रेलियाला १५४ धावांवरच रोखले आणि भारतानं पाच सामन्यांची मालिका सहज खिशात घातली.

(Latest Marathi News)

रिंकू काय म्हणाला?

रिंकू सिंहने शुक्रवारी बीसीसीआय टीव्हीवर जितेशशी बोलताना स्फोटक फलंदाजीमागचं सीक्रेट उघड केलं. मी बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळतोय. मागील पाच- सहा वर्षे आयपीएलमध्ये खेळतोय. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलाय. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, असं रिंकू म्हणाला.

जितेशनं केलं रिंकूचं कौतुक

जितेशनं रिंकूचं कौतुक केलं. ज्यावेळी फलंदाजीला आलो, तेव्हा खूप दबावात होतो. पण रिंकूचा संयम बघून आश्चर्यचकित झालो, अशी कबुली जितेशने दिली. ही रिंकूची पहिलीच मालिका आहे, असं वाटतच नव्हतं. रिंकू खूपच शांत होता आणि क्लीन हिट करत होता, असं जितेश म्हणाला.

उत्तुंग षटकारांचे 'राज' काय?

रिंकूने १०० मीटरचा षटकार लगावला. या उत्तुंग षटकारामागचं सीक्रेट काय असं त्याला विचारण्यात आलं. त्यावर मी नियमितपणे जीममध्ये जातो. मला वजन उचलणं आवडतं. त्यामुळं ताकद वाढते. रिंकूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंतच्या चार सामन्यांतील तीन डावांत ९९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १९० पेक्षा अधिक आहे. तर १२ चौकार आणि चार षटकार लगावले आहेत. (Team India)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT