Rinku singh not included in team india squad hardik pandya picked for icc t20 world cup 2024 amd2000 twitter
Sports

Team India Squad: हार्दिक आला पण रिंकू गेला...शानदार कामगिरी करुनही पत्ता कट

Rinku Singh, T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र रिंकू सिंगला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मासोबत सलामीला कोण जाणार? यष्टीरक्षक म्हणून कोणाला स्थान मिळणार? फिनिशर म्हणून संघात कोणाला स्थान मिळणार? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान संघाची घोषणा होताच हे सर्व प्रश्न सुटले आहेत. बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात फलंदाजीवर अधिक भर देण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी या फलंदाजांना मिळालं स्थान...

या संघाबद्दल बोलायचं झालं, तर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली ही तिकडी टॉप ऑर्डरमध्ये खेळताना दिसेल. तर मध्यक्रमात सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसनसारख्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर फिनिशर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. तर राखीव खेळाडू म्हणून शुभमन गिल, शिवम दुबेसारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

रिंकू सिंगचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश..

भारतीय संघाची निवड करताना फलंदाजीवर अधिक भर देण्यात आला आहे. कारण बॅटींग लाईनअपमध्ये ७-८ व्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत. या संघात फिनिशर म्हणून शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आला आहे. तर रिंकू सिंगला राखीव खेळाडू म्हणून स्थान दिलं गेलं आहे.

रिंकू सिंगने सातत्याने चांगली कामगिरी केली. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. मात्र तरीदेखील त्याचा मुख्य संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नेटकरी नाराज असल्याचं पाहायला मिळालं आहे. रिंकू सिंगचा रेकॉर्ड पाहिला, तर १५ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ८९ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत. तर आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४० सामन्यांमध्ये त्याने ८४८ धावा केल्या आहेत. असं असतानाही त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT