GT vs KKR Match Highlights : अखेरच्या षटकात रिंकू सिंगने केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकात्ता नाईट राईडर्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्सनी थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात कोलकाताला तब्बल २९ धावांची गरज होती. हा विजय अशक्य वाटत असताना मैदानावर असलेल्या रिंकू सिंगने सलग ५ चेंडूत ५ षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट राइडर्सला विजयासाठी २०५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्ता नाईट राईटर्सचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले.
मात्र मधल्या फळीचा फलंदाज रिंकू सिंगने अखेरच्या काही षटकात गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रिंकू सिंगने २१ चेंडूत ४८ धावा चोपल्या. अखेरच्या षटकात कोलकाता नाईट राईडर्सला विजयासाठी तब्बल २९ धावांची गरज होती. यश दयालने टाकलेल्या या शेवटच्या रिंकू सिंगने आपली पॉवर दाखवली. त्याने सलग पाच षटकार ठोकत संघाला थरारक विजय मिळवून दिला.
२०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली होती. सलामी फलंदाज गुरबाज आणि नारायण जगदिशन झटपट बाद झाले. त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. व्यंकटेश अय्यर ८३ धावा आणि नितेश राणाने ४५ धावांची खेळी केली.
वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा दोघेही बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव कोसळळा. एकापाठोपाठ एक विकेट पडल्या. राशिद खान याने हॅट्ट्रिक घेत गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या. आंद्रे रसेल, नारायण आणि शार्दूल ठाकूर यांना राशिद खान याने तंबूचा रस्ता दाखवला. हा सामना कोलकात्याच्या हातून गेला असेच वाटत होते.
पण अखेरच्या षटकात रिंकू सिंह याने करिश्माई फलंदाजी केली. यश दयाल याच्या अखेरच्या पाच चेंडूवर रिंकू सिंह याने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.