Rinku Singh SIx Twitter
Sports

Rinku Singh Six: बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं! नवीनच्या चेंडूवर रिंकूचा ११० मीटरचा खणखणीत षटकार VIDEO पाहायलाच हवा

Rinku Singh Six On Naveen Ul Haq Ball: रिंकू सिंगच्या एका षटकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Ankush Dhavre

KKR VS LSG, IPL 2023: रिंकू सिंग हे नाव येणाऱ्या काळात प्रचंड गाजणार आहे. लवकरच हा खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो. आयपीएल २०२३ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रवास संपला आहे.

मात्र रिंकू सिंगचा खरा प्रवास इथून सुरु झाला आहे. त्याने या हंगामात जोरदार कामगिरी करत स्वतःला फिनिशर म्हणून सिद्ध केलं आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाताचा विजय १ धावेने हुकला. मात्र रिंकू सिंगच्या एका षटकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रिंकूची एकाकी झुंज..

कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी १७७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय नंतर कुठल्याही फलंदाजाला खेळपट्टीवर टिचून फलंदाजी करता आली नव्हती.

शेवटी रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी शेवटच्या षटकापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होती. त्याने या डावात ३३ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. यादरम्यान नवीन उल हकच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने ११० मीटरचा खणखणीत षटकार मारला. (Latest sports updates)

रिंकू सिंगचा ११० मीटरचा षटकार..

लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी नवीन उल हक गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्या ३ चेंडूवर चौकार आणि षटकार मारत त्याने नवीन उल हकची लाईन लेंथ बिघडवली.

नवीन उल हकने ओव्हर द विकेटचा मारा करत पाचवा चेंडू टाकला. हा चेंडू रिंकू सिंगला पट्ट्यात मिळाला. चेंडू क्रीझवर पडताच रिंकू सिंगने जोरात बॅट फिरवली. हा चेंडू त्याने डीप स्क्वेअर लेगच्या वरून ११० मीटर लांब फेकला.

या षटकारासह रिंकू सिंगने आपले अर्धशतक पूर्ण केले. या हंगामात सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम हा फाफ डू प्लेसिसच्या नावे आहे. त्याने ११५ मीटर लांब षटकार मारला होता.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने ८ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या.

या संघाकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली होती. तर क्विंटन डी कॉकने २८ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. मात्र कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

SCROLL FOR NEXT