Virat kohli and ricky ponting  Saam Tv
Sports

Ricky Ponting : विराट नव्हे तर 'या' पाक खेळाडूला रिकी पॉंटिंगने म्हटले ऑल टाईम ग्रेट

ऑस्टेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगला जेव्हा सर्वोत्तम खेळाडू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने विराट नव्हे तर दुसऱ्याच एका खेळाडूचे नाव घेतले आहे.

Saam TV News

Ricky Ponting: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य फलंदाज विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे.

तो वर्तमान क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मात्र ऑस्टेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगला (Ricky Ponting) जेव्हा सर्वोत्तम खेळाडू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने विराट नव्हे तर दुसऱ्याच एका खेळाडूचे नाव घेतले आहे. (Latest Sports Updates)

ऑस्ट्रेलियाला २००३ आणि २००७ विश्वचषक जिंकवून देणाऱ्या रिकी पॉंटिंगने आयसीसी रिव्ह्यू एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला गेला होता.

यावेळी त्याने विराट कोहली नव्हे तर बाबर आझमचे नाव घेतले आहे. तसेच त्याने बाबर आझमचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

रिकी पॉंटिंगने म्हटले की, 'पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज बाबर आजम हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत असताना कुठलाही विक्रम मोडून काढू शकतो.' रिकी पॉंटिंगचे हे कौतुकाचे बोल ऐकताच बाबर आझमने म्हटले की, 'रिकी पॉंटिंगकडून आपलं कौतुक होणं ही खूप मोठी बाब आहे. यामुळे नक्कीच माझा आत्मविशास वाढला आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की,' मला वाटतं बाबरला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. तो पहिल्यांदा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि सलग दुसऱ्यांदा आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ठरला आहे. त्याला खेळताना पाहणं मला आवडतं . मात्र त्याला आणखी सुधारणा करावी लागेल. मी आशा करतो की, हा बदल आम्हाला लवकरच पाहायला मिळेल.'

याबाबत बोलताना बाबर आझम म्हणाला की, 'मी नेहमी माझे खेळाडू चांगली कामगिरी कशी करतील यावर लक्ष केंद्रित करत असतो. मी नेहमी हाच विचार करतो की, पाकिस्तानचा मजबूत संघ मैदानात उतरला पाहिजे आणि सर्वोत्तम खेळाडूला संधी मिळाली पाहिजे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फटाके बनवत असताना भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, अख्खं गाव हादरलं

पुण्यात ९ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी, विभागीय आयुक्तांनी थेट आदेश काढला, कारण काय?

Saam Music : संगीताच्या विश्वात नव्या सुरांची साद; 'साम म्युझिक' युट्यूब चॅनेलची दिमाखदार सुरुवात

पुणे, विदर्भ अन् मराठवाड्यात कुणाचा आमदार? Exit पोलचा धक्कादायक अंदाज, शिक्षक-पदवीधर मतदारसंघात गुलाल कोण उधळणार?

BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

SCROLL FOR NEXT