ENG vs AUS 4th Test Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरु आहे. अनेक छोट्या मोठ्या वादांमुळे ही मालिका चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यातही आणखी एक वाद पेटल्याचं दिसून आलं आहे. यावेळी जो रूटने टिपलेला कॅच चर्चेचा विषय ठरतोय. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
जो रूटच्या कॅचमुळे पेटला वाद..
तर झाले असे, ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी सुरु असताना ख्रिस वोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाकडून स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. ख्रिस वोक्सचा चेंडू स्टीव्ह स्मिथच्या बॅटचा कडा घेत जो रूटच्या हातात गेला. रूटने कॅच घेतला मात्र अपील केली नाही. अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय पाठवला. जेव्हा रिप्लेमध्ये पाहिलं तेव्हा हा क्लोज कॉल असल्याचं दिसून आलं. मात्र चेंडू जमिनीच्या अगदी जवळ होता. त्यामुळे हा क्लीन कॅच आहे की नाही हे कळू शकत नव्हतं.
अंपायरने दिलं नॉट आउट..
रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर टीव्ही अंपायर कुमार धर्मसेना यांनी आपला निर्णय दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की, चेंडू जमिनीला स्पर्श झाला आहे. त्यामुळे त्यांनी फलंदाज नॉट आउट असल्याचा निर्णय दिला.
हा निर्णय येताच समालोचन करत असलेल्या मार्क बाऊचरने म्हटले की, 'स्टीव्ह स्मिथचा जीव टांगणीला लागला असेल..' याचा अर्थ असा की, स्टीव्ह स्मिथ भयभीत झाला असेल. (Latest sports updates)
मार्क बाऊचरला रिकी पॉंटिंगचे प्रत्युत्तर..
याबाबत बोलताना रिकी पॉंटिंग म्हणाला की, 'मला असं वाटतं की, कधी कधी खेळाडूंची रिअॅक्शन देखील महत्वाची ठरते. कॅच पकडल्यानंतर तो कॅच लिगल आहे की नाही हे तुम्हाला चांगलंच माहित असतं. ज्यावेळी रूटने कॅच पकडला त्यावेळी तो हवेत बॉल फेकून अपील करू शकला असता. मात्र तो बॉल जमिनीला स्पर्श झालाय की नाही हे पाहत बसला. '
स्मिथ खरच नॉट आउट होता का? यावरून दोन्ही समालोचकांमध्ये चर्चा रंगल्याचे दिसून आले. जीवदान मिळूनही स्टीव्ह स्मिथला मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या १७ धावा करत माघारी परतला. त्याला मार्क वुडने बाद करत माघारी धाडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.