records made in sunrisers hyderabad vs mumbai indians match ipl 2024 cricket news in marathi amd2000
records made in sunrisers hyderabad vs mumbai indians match ipl 2024 cricket news in marathi amd2000 twitter
क्रीडा | IPL

Records In SRH vs MI: आयपीएल स्पर्धेतील ऐतिहासिक सामना! एकाच सामन्यात मोडले गेले हे मोठे रेकॉर्ड्स

Ankush Dhavre

Records In SRH vs MI Match:

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान झालेला सामना ऐतिहासिक ठरला आहे. या सामन्यात मुबंई इंडियन्स संघाला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत २७७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला २४६ धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यात १० मोठे रेकॉर्ड बनवले गेले आहेत.

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या..

या सामन्यात हैदराबादने २७७ धावांचा डोंगर उभारला. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या नावे होता. या संघाने २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ५ गडी बाद २६३ धावा केल्या होत्या.

एका सामन्यात सर्वाधिक धावा..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २७७ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने २४६ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावा केल्या. (Cricket news in marathi)

सर्वाधिक षटकार..

हैदराबाद आणि मुंबई यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात एकूण ३८ षटकार मारले गेले आहेत. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी १८ आणि मुंबईच्या फलंदाजांनी २० षटकार मारले.

धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी धावसंख्या..

या सामन्यात हैदराबादने २७७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईने कडवी झुंज दिली. मुंबईने २० षटकअखेर ५ गडी बाद २४६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने रचला इतिहास..

अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड या दोन्ही फलंदाजांनी इतिहासाला गवसणी घातली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच २ फलंदाजांन २० पेक्षा कमी चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

क्वेना मफाका

या स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या क्वेना मफाकाने ४ षटकात ६६ धावा खर्च केल्या .तो पदार्पणात गोलंदाजी करताना सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: ऋतू फिरला!... उन्हाळ्यात पावसाळ्यासारख्या धुवाधार बरसला; पुण्यात रस्ते तुडुंब, अर्ध्या महाराष्ट्राला 'अवकाळी' तडाखा

Shivali Parab : मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली शिवानी ते कल्याणची चुलबुली

Gujrat News: लेकासाठी ४० लाखाचं कर्ज काढलं; परदेशात जाताच मुलाने नात तोडलं, माता- पित्याची आत्महत्या

Karnataka News: साखरपुडा मोडला, नराधम पिसाळलाच! तिचं मुंडकं छाटून गावभर फिरला, मन सुन्न करणारी घटना

Election Commission : मतदान प्रक्रियेवरच हल्ला; काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रातून उत्तर

SCROLL FOR NEXT