DC-W VS RACB-W
DC-W VS RACB-W Saam TV
क्रीडा | IPL

WPL 2023: पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आज RCB उतरणार मैदानात, इथे पाहा सामना लाईव्ह

Ankush Dhavre

DC-W VS RCB-W: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत.

आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. डी वाय पाटील स्टेडियमवर पार पडणारा हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. (Latest sports updates)

पहिल्या विजयाच्या शोधात आरसीबी उतरणार मैदानात..

दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात जोरदार विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दिल्ल्लीने आतापर्यंत खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर आरसीबीबद्दल बोलायचं झालं तर या संघाला अजून खातं देखील उघडता आलं नाहीये. या संघाने चारही सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघ हा संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे .

आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ यापूर्वी देखील आमने सामने आले होते. या सामन्यात आरसीबी संघाला ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यात शफाली वर्माने ८४ तर लॅनिंगने ७२ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर दिल्लीने २२३ धावांचा डोंगर उभारला होता.

दिल्ली कॅपिटल्स विरुध्द आरसीबी सामना कुठे पाहू शकता?

दिल्ली कॅपिटल्स विरुध्द आरसीबी यांच्यात होणारा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स १८ वर पाहू शकता.

दिल्ली कॅपिटल्स विरुध्द मोबाईलवर कसा पाहणार लाईव्ह?

दिल्ली कॅपिटल्स विरुध्द आरसीबी यांच्यात होणारा सामना तुम्ही जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT