Manasvi Choudhary
बटाटा वडे, बटाटा भाजी खाऊन अनेकांना कंटाळा आला असेल.
यासाठी आज आम्ही तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीची बटाट्यापासून बनणारी रेसिपी सांगणार आहोत.
आलू कोफ्ता चविष्ट डिश आहे. बटाट्यापासून बनणारा हा पदार्थ लहान मुलांना देखील आवडेल.
आलू कोफ्ता बनवण्यासाठी कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, धने, आलं, जिरे, लाल मिरची पावडर, हळद पावडर, गरम मसाला, मीठ, तेल हे साहित्य घ्या.
आलू कोफ्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून ते किसून घ्या.
एका भांड्यात किसलेले बटाटे, बेसन, मीठ, हळद, मिरची पावडर, धने पावडर मिक्स करा.
नंतर या मिश्रणाचे गोल गोळे तयार करा. गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये बटाट्याचे गोळे तळून घ्या.
आलू कोफ्त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
ं
बटाट्याच्या कोफ्त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये गरम तेलामध्ये कांदा घाला नंतर हिरवी मिरची, टोमॅटो, आले शिजवून घ्या.
या मिश्रणात धना पावडर, मसाला, हळद घालून परतून घ्या. हे मिश्रणा मिक्सरला बारीक वाटून घ्या. अशाप्रकारे मसाला तयार होईल.
गॅसवर पॅनमध्ये मसाला परतून घ्या त्यात तळलेले कोफ्ते घाला आणि शिजवून घ्या. अशाप्रकारे बटाटा कोफ्ता सर्व्हसाठी तयार आहे.