TET Exam: टीईटी पास व्हा, नाहीतर नोकरी सोडावी लागणार...शिक्षकांवर सेवानिवृत्तीची टांगती तलवार, वाचा सविस्तर

TET Exam Mandatory for All Teachers: देशातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. जर शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्यावर सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे.
TET Exam
TET ExamSaam Tv
Published On

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा देणे अनिवार्य केले आहे. आता सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणी आहे. ज्या शिक्षकांचे वय ५२ पेक्षा कमी आहे त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.

TET Exam
TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

शिक्षकांसाठी होणारी ही टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी राज्यातील हजारो शिक्षक अर्ज करणार आहे. दरम्यान, जे शिक्षक ही परीक्षा देणार नाहीत किंवा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे.

शालेय शिक्षक विभागाच्या निर्णयानुसार, २०१३ पासून शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे. त्याआधीच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक नव्हती. दरम्यान, आता सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायलयाने एका निकालात म्हटलं आहे. यावर काही राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दाखवली आहे.

महाराष्ट्राने अद्याप पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी देण्यात आली आहे. दरम्यान, ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांवर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे.

TET Exam
School Education: सरकारी शाळेचा खर्च फक्त ३ हजार, खासगी शाळांनी केला खिसा रिकामा, NSS सर्वेक्षणाचे आकडे वाचून धक्का बसेल

वयाच्या ५२ वर्षांपर्यंतच्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबरला ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी अनेक शिक्षकांनी तयारी दाखवल्याचे दिसत आहे.

TET Exam
TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com