UP Warriors beat RCB by 10 wickets Twitter
Sports

RCB Vs UPW: स्मृती मंधनाच्या संघाचा सलग चौथा पराभव! यूपी वारियर्सची आरसीबीवर 10 विकेटने मात

WPL 2023 : स्मृती मंधनाच्या संघाचा हा या स्पर्धेतला सलग चौथा पराभव ठरला. अॅलिसा हिलीच्या ४७ चेंडूत ९२ धावांच्या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने अवघ्या १३ षटकात मॅच संपवत शानदार विजय मिळवला.

Chandrakant Jagtap

RCB Vs UPW WPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एका मोठ्या पराभवाचा समाना करावा लागला आहे. महिला प्रिमियर लीगमध्ये आज झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सने आरसीबीचा १० विकेटने पराभव केला.

स्मृती मंधनाच्या संघाचा हा या स्पर्धेतला सलग चौथा पराभव ठरला. अॅलिसा हिलीच्या ४७ चेंडूत ९२ धावांच्या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने अवघ्या १३ षटकात मॅच संपवत शानदार विजय मिळवला.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाला पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सने आरसीबीचा ७ षटक शिल्लक ठेवून आणि १० गडी राखून पराभव केला.

हा यूपी वॉरियर्आसचा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने स्फोटक अर्धशतक झळकावले, तर सोफी एक्लेस्टन आणि दीप्ती शर्मा या फिरकी जोडीने आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

हिलीने ४७ चेंडूंत १८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९६धावांची नाबाद खेळी खेळली. देविका वैद्यने ३१ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १९.३ षटकांत केवळ १३८ धावाच करता आल्या. यूपी वॉरियर्सने हे लक्ष्य १३ षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. बंगळुरू संघाचा हा सलग चौथा पराभव आहे. संघ अजूनही या स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. यूपी वॉरियर्सला तीन सामन्यांत दुसरा विजय मिळाला. संघ चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Maharashtra Live News Update: ST प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

SCROLL FOR NEXT