IND VS AUS 4th test: पडला, धडपडला तरीही पठ्ठयाने चेंडू शोधून काढला; आजच्या दिवसातील फॅन मुमेंट नक्की पाहा - VIDEO

दरम्यान दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना एक मजेशीर घटना घडली,ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ind vs aus
ind vs ausTwitter

Ind vs aus 4th test viral video: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

दरम्यान दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना एक मजेशीर घटना घडली,ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

ind vs aus
IND VS AUS 4th test: रोहित - गिलची दमदार सुरुवात, ४८० धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या बिनबाद ३६ धावा, पाहा स्कोअरकार्ड

तर झाले असे की , ऑस्ट्रेलिया संघाचा डाव संपुष्ठात आल्यानंतर भारतीय संघातील फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानात आले होते. भारतीय संघाकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली.

दरम्यान शुभमन गिलने नॅथन लायनच्या चेंडूवर स्टेप आउट होऊन गगन चुंबी षटकार मारला. हा चेंडू साईड स्क्रीनमध्ये जाऊन पडला. त्यावेळी तो चेंडू सापडत नव्हता. अंपायरने नवीन चेंडू देखील मागवला.

ind vs aus
Ind vs Aus 4th Test: …म्हणून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

मात्र एका अतिउत्साही प्रेक्षकाने थेट साईड स्क्रीनवर उडी मारली आणि आत जाऊन चेंडू शोधून काढला. चेंडू शोधल्यानंतर तो भलताच खुश असल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३६ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com