ipl playoff saam tv
Sports

RCB vs GT Match Result: लेट आलो पण थेट आलो..गिलच्या शतकानं गुजरातचा विजय; RCB बाहेर तर मुंबईची Playoff मध्ये एंट्री

IPL Playoffs Scenario: शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

RCB vs GT, IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले आहेत. शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुध्द गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने या स्पर्धेतील सलग दुसरे शतक झळकावले.

यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ गडी बाद १९७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उभारला १९७ धावांचा डोंगर...

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग केला जातो. त्यामुळे हार्दिक पंड्याने हा निर्णय घेतला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर कर्णधार फाफ प्लेसिसने २८ धावांचे योगदान दिले. तर मायकेल ब्रेसवेलने २६ धावांचे योगदान दिले. २० षटक अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १९७ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

विराटची शतकी खेळी व्यर्थ

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र फाफ डू प्लेसिस २८ धावा करत माघारी परतला.

तर विराट कोहलीने शेवटच्या चेंडूपर्यंत एक बाजू सांभाळून ठेवली. त्याने या डावात १३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १०१ धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील ७ वे शतक झळकावले.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक

गुजरात टायटन्स:

शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

SCROLL FOR NEXT