वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. स्पर्धेतील फायनलचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून, फायनलमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
कसा आहे रेकॉर्ड?
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा रेकॉर्ड चिंता वाढवणारा राहिला आहे. गेल्या हंगामात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केलं होतं.
या हंगामातही दोन्ही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केवळ १ धावेने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
या हंगामात कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गेल्या हंगामातही दिल्लीच्या संघाने शानदार कामगिरी केली होती. यासह थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. (Cricket news in marathi)
मात्र फायनलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं आव्हान असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने ८ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबईला पराभूत करत फायनलमध्ये स्थान मिळवलं.
असे आहेत दोन्ही संघ :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: स्मृति मंधाना (कर्णधार), मेघना, इंद्रानी रॉय, ऋचा घोष, दिशा कसत, शुभा सतीश,सिमरन भादुर, नदीन डे क्लर्क, सॉफी डिवाइन, श्रेयंका पाटील, एलिस पेरी, एकता बिष्ट, केट क्रॉस, सॉफी मोलीन्यूक्स, श्रद्धा पोखारकर, रेणुका ठाकुर सिंग, जियोर्जिया, आशा सोभाना.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लेनिंग (कर्णधार), तानिया भाटिया, जेमिमा, रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, एलिस कॅप्सी, मारिजान कॅप, शिखा पांडे, एनाबेल सदरलँड, जेस जॉनासन, मिन्नु मणी, पूनम यादव, अरुणदति रेड्डी, तितास साधु, राधा यादव, अश्वनी कुमारी, अपरना मोंडाल, स्नेहा दीप्ती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.