Ravindra Jadeja
Ravindra Jadeja saam TV
क्रीडा | IPL

जड्डू अन् चेन्नईत आणखी बिनसलं; जडेजाचा CSKला कायमचा रामराम?

Pravin

चेन्नईचा माजी कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) एकमेकांनी अगोदर इंस्टाग्रामवरती अनफॉलो केले आहे. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जडेजा चेन्नईच्या संघाला कायमचा रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. जडेजाच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले की जड्डूला चेन्नईच्या व्यवस्थापनाने मनापासून दुखावले आहे.

सुत्रांनी एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना सांगितले ''हा खरंच रविंद्र जडेजा अस्वस्थ आणि खूप दुखावला आहे. कर्णधार म्हणून त्याने आगामी काळात चांगली कामगिरी केली असती. जडेजासोबत सर्व गोष्टी अचानक झाल्या. जडेजासोबत जे झाले त्यामुळे कोणताही माणून अस्वस्थ होईल.'' चेन्नईच्या व्यवस्थापनाकडून अजून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या अगोदर चेन्नई संघाच्या सीईओंनी सांगितले होती की जडेजा आणि आमच्यात सर्व काही ठिक आहे तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो संघापासून दूर झाला आहे. जडेजाला दुखापत झाली होती परंतु ती किती गंभीर आहे याबाबत मी सांगू शकत नाही असे सुत्राने सांगितले

चेन्नईच्या संघाने अधिकृत माहिती दिली होती की त्याच्या बरगडीला दुखापत झाली आहे त्यामुळे आगामी सामन्यात खेळू शकत नाही. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले होते की चेन्नई अगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, त्यामुळे टीम जडेजाच्या दुखापतीबाबत जास्त जोखीम नाही घेऊ शकत. परंतु जडेजा आता पुढचा हंगामा चेन्नईच्या संघासाठी खेळेल का नाही हा मोठा प्रश्न आहे. पुढच्या वर्षीच्या हंगामात जडेजा लिलावात असेल का नाही याविषयी आता तरी सांगणं कठीण आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT