Ravindra Jadeja Saam Tv
Sports

Ravindra Jadeja: जडेजावर Ball Tampering चा आरोप होताच मॅच रेफ्रीने घेतली टोकाची भूमिका; लागणार १२ महिन्यांचा बॅन?

या डावात ५ गडी बाद करणारा रवींद्र जडेजा २ कारणांमूळे चर्चेत राहिला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Saam TV News

Ind vs Aus 1st Test Ravindra Jadeja: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे.

हा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला.

भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १७७ धावांवर संपुष्टात आला. या डावात ५ गडी बाद करणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) २ कारणांमूळे चर्चेत राहिला. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

जडेजाने पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले. जडेजाची ही कामगिरी ऑस्टेलियाला पचली नाही. त्यामुळे त्यांनी जडेजावर बॉल टेंम्परिंगचा आरोप केला आहे.

जडेजावर बॉल टेंम्परिंगचा आरोप झाल्यानंतर रेफ्रींनी उचलले महत्वाचे पाऊल..

रवींद्र जडेजावर बॉल टेंम्परिंगचा आरोप होताच, मॅच रेफ्री अँडी पाईक्रॉफ्ट ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. अँडी पाईक्रॉफ्ट हे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रेफ्रीच्या भूमिकेत आहेत.

रवींद्र जडेजावर आरोप होताच, त्यांनी रोहित शर्मा आणि भारतीय संघाच्या मॅनेजरसोबत सोबत चर्चा केली आहे. (Latest Sports Update)

रोहित आणि मॅनेजरला दाखवला व्हिडीओ..

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, जडेजाचा व्हिडीओ व्हायरल होताच. अँडी पाईक्रॉफ्ट यांनी रोहित आणि मॅनेजरला व्हिडीओ दाखवला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रवींद्र जडेजाला गोलंदाजी करण्यासाठी येण्यापूर्वी मोहम्मद सिराज त्याच्याजवळ येतो.

सिराजने आपल्या हाताला एक चकाकणारी गोष्ट लावली आहे. जडेजा ही चकाकणारी गोष्ट आपल्या हाताला लावताना दिसून येत आहे. असे म्हटले जात आहे की, अँडी पाईक्रॉफ्टने रोहित शर्माला केवळ घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी जडेजावर कुठलाही आरोप केला नाहीये.

त्यांनतर टीम मॅनेजरने अँडी पाईक्रॉफ्ट यांना मैदानावर घडलेला घटनाक्रम समजावून सांगितला. जडेजाने हे कृत्य बॉल टेंम्परिंगच्या हेतूने केले नव्हते. तर त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. बोटाचे दुखणे घालवण्यासाठी तो बोटाला मलम लावत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT