Ravi Shashtri Twitter
Sports

रोहित, विराटचं काम नाही; रवी शास्त्रींनी सुचवली तीन कर्णधारांची नावं

२०२१ मध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक गमावला नतर कोहलीने स्वत:हून टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला.

वृत्तसंस्था

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नुकतंच प्रशिक्षक पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यांची जागा राहुल द्रविड यांनी घेतली आहे. रवी शास्त्री यांना त्यांच्या वक्तव्यासाठाही ओळखले जाते. त्यांनी आता थेट भारताचा पुढचा लाँग टर्मसाठी कर्णधार कोण असेल याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये भारताला पुढचा लाँग टर्म कर्णधार मिळेल असे त्यांनी सांगितले आहे. नुकतंच सर्व फॉरमॅटमधील कर्णधार पदाची जबाबदारी विराटकडून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावरती आली आहे. रोहित शर्मा हा आता ३४ वर्षांचा आहे त्यामुळे भारताला युवा कर्णधाराची गरज आहे.

२०२१ मध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक गमावला नतर कोहलीने स्वत:हून टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला. मग त्याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधार पदावरुनही काढण्यात आले. त्यानंतर त्याने कसोटीचेही कर्णधार पद सोडले. भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण? त्यासाठी एकच नाव समोर येत होते ते म्हणजे रोहित शर्मी. आपसुकच या सर्व फॉरमॅटमधील कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर आली.

रोहित शर्मा, विराट कोहली आता युवा खेळाडू राहिलेला नाहीत. त्यांना दोन ते तीन वर्षात भारताचा पुढील कर्णधार कोण असेल हे निवडावे लागेल असे रवी शास्त्री ESPN शी बोलताना म्हणाले.

रवी शास्त्रींनी सुचवली तीन नावं

शास्त्री म्हणाले की संघ व्यवस्थापक ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या यांच्यावर लक्ष ठेवून असतील. हे सर्वजण आयपीएलमध्ये त्यांच्या विशिष्ट संघांचे नेतृत्व करत आहेत. यंदाच्या हंगामात ऋषभ पंत दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाचे नेतृत्व करत आहे. तर श्रेयश अय्यर केकेआर (KKR), केएल राहुल लखनैच्या (Lucknow Super Giants) संघाचे नेतृत्व करत आहे. यांच्या कर्णधार म्हणून कामगिरीकडे विशेष लक्ष दिले जाईल.

हार्दीक पांड्याही गुजरातच्या संघाच्या नेतृत्व करत आहे. त्याच्या कामगीरीकडेही लक्ष असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मागच्या काही काळात अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. शास्त्री म्हणाले की या खेळाडूंच्या कामगिरीवरतीही यंदाच्या हंगामात लक्ष असेल ते कसे कामगिरी करतात. आगामी काळात भारताला ऑस्ट्रलियामध्ये टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. त्या दृष्टिने भारतीय संघाने प्रयत्न सुरु केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT