Ravi Shastri Statement saam tv news
क्रीडा

Ravi Shastri Statement: अन् तुम्ही स्वत: ला वर्ल्ड चॅम्पियन म्हणवता..? दारुण पराभवानंतर रवी शास्त्रींनी टोचले इंग्लिश खेळाडूंचे कान

Ravi Shastri Statement On England Cricket Team: या सामन्यातील दारूण पराभवानंतर रवी शास्त्रींनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Ravi Shastri Statement On England Cricket Team:

इंग्लंडचा संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन म्हणून प्रवेश केला होता. मात्र त्यांना या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडसाठी वर्ल्डकप २०२३ स्पर्धा एकवाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेली नाही.

कारण जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने ६ पैकी ५ सामने गमावले आहेत. तर केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. इंग्लंडचा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. दरम्यान या सुमार कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना खडेबोल सुनावले आहे.

रवी शास्त्री सध्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत समालोचकाची भुमिका पार पाडताना दिसून येत आहेत. समालोचमन करत असताना ते म्हणाले की,'इंग्लंडचा संघ निश्चितच निराश असेल. प्रेक्षक आणि समर्थकही निराश असतील. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून १७ षटके असतानाच सामना गमवावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २० व्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ ३० व्या षटकात ऑल आउट झाला होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने २५ षटकात हा सामना जिंकला होता. आज भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ ३२ व्या षटकात ऑल आऊट झाला. तुम्ही स्वत:ला वर्ल्ड चॅम्पियन समजता?' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, 'जर कोणी मला विचारलं की, भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये काय फरक आहे, तर मी सरळ सांगेल की हे अंतर ८ संघांच आहे.'

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इंग्लंडचा संघ सुपर फ्लॉप..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इंग्लंडने केवळ बांगलादेशला पराभूत केलं आहे. तर न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये इंग्लंडचा संघ कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT