Saurav Ganguly
Saurav Ganguly Saam TV
क्रीडा | IPL

Ranji Trophy 2022: रणजी ट्राफीची तारीख ठरली; पण ठिकाणाबाबत संभ्रम

वृत्तसंस्था

रणजी ट्राफीची तारीख ठरली आहे. BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यंदाची रणजी ट्राफी (Ranji Trophy 2022) दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. गांगुलींच्या म्हणण्यानुसार बीसीसीआय (BCCI) 13 फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरू करण्याच्या विचारात आहे. यासोबतच बीसीसीआय अध्यक्षांनी असेही सांगितले की, स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सर्व संघांची 5 गटात विभागणी करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात 6 संघ असतील. तर प्लेट गटात 8 संघ असतील. सौरव गांगुलींनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधत स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारखेची पुष्टी केली.

ते म्हणाले, “आम्ही फेब्रुवारीच्या मध्यापासून रणजी करंडक सुरू करण्याचा विचार करत आहोत. ही तारीख 13 फेब्रुवारी असू शकते. सध्या रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट तसाच राहणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा एक महिन्याचा असेल जो आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी खेळवला जाईल.

स्पर्धेच्या ठिकाणाबाबत सोमवारपर्यंत निर्णय होऊ शकतो

सौरव गांगुली म्हणाले "आयपीएल 2022 27 मार्चपासून आयोजित करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत जून-जुलैमध्ये रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीचे आयोजन केले जाईल. जोपर्यंत कोरोनामुळे यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत स्पर्धेचे स्वरूप तसेच राहील. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही स्पर्धेचे ठिकाण ठरवार आहोत. बंगळुरू आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. आम्ही सध्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत आहोत. सोमवारपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल.

बाद फेरीचे सामने बेंगळुरूला?

रणजी ट्रॉफी आधी 6 शहरांमध्ये होणार होती, ज्यात मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, तिरुवनंतपुरम आणि चेन्नई यांचा समावेश होता. बाद फेरीचे सामने कोलकात्यात खेळवले जाणार आहेत. गांगुलींनी बाद फेरीदरम्यान येणाऱ्या अडथळ्यांबाबतही सांगितले. कारण त्यावेळी भारतात पावसाळा असणार आहे. गांगुली म्हणाले, “आम्ही त्यावेळी बंगळुरूमध्ये बाद फेरीचे सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करू. बाकी बघू. मात्र येत्या 15 ते 20 दिवसांत सर्वकाही सुरळीत होईल, हे निश्चित.

रणजी ट्रॉफी 13 जानेवारीपासूनच होणार होती. पण कोरोनामुळे बीसीसीआयने 4 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच कूचविहार आणि महिलांच्या स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या. पण त्या सर्व स्पर्धा लवकरच आयोजित केल्या जातील अशी गांगुलींना आशा आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सोलापुरात स्मार्ट सिटीच्या पाईपांना भीषण आग

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

SCROLL FOR NEXT