vidarbha twitter
Sports

Ranji Trophy Final: विदर्भाचे वाघ केरळवर पडले भारी! तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव

Vidarbha vs Kerala, Ranji Trophy Final: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये केरळ आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

Ankush Dhavre

दुबईत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार सुरु आहे. तर भारतात रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात विदर्भ आणि केरळ हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. विदर्भ संघाने सेमीफायनमध्ये गतविजेत्या मुंबईला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता.

तर केरळने गुजरातला पराभूत करत पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचण्याचा कारनामा केला होता. गेल्या हंगामात विदर्भाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यावेळी कसर पूर्ण करत विदर्भाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर केरळ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या विदर्भ संघाला ३७९ धावा केल्या होत्या. विदर्भ संघाकडून फलंदाजी करताना युवा फलंदाज दानिश मालेवारने सर्वोधिक १५३ धावांची खेळी केली. तर करुण नायरने ८६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर विदर्भाने ३७९ धावांपर्यंत मजल मारली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या केरळ संघाचा डाव ३४२ धावांवर आटोपला. केरळकडून फलंदाजी करताना सचिन बेबीने ९८ धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. तर आदित्य सरवटेने ७९ धावा केल्या. यासह विदर्भ संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली.

जी दुसऱ्या डावात या संघाला चांगलीच कामी आली. दुसऱ्या डावात जेव्हा विदर्भाचा संघ फलंदाजीसाठी आला. त्यावेळी विदर्भाच्या फलंदाजांनी पाचव्या दिवसातील दुसऱ्या सेशनपर्यंत फलंदाजी केली. या डावात विदर्भाचा अनुभवी फलंदाज करुण नायर पुन्हा एकदा चमकला. पहिल्या डावात त्याचं शतक हुकलं होतं.

मात्र दुसऱ्या डावात त्याने दमदार खेळी केली. त्याने १३५ धावा चोपल्या. तर पहिल्या डावातील शतकवीर दानिशने ७३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर विदर्भाने ३७५ धावा केल्या. शेवटी हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला.

विदर्भाची रणजी ट्रॉफीत कमाल

विदर्भाने गेल्या हंगामातील फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र या सामन्यात विदर्भाला मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यापूर्वी २०१८, २०१९ मध्ये या संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. आता पुन्हा एकदा या संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT