Raksha Bandhan 2024 Vinesh Phogat 
Sports

Raksha Bandhan 2024 : विनेश फोगाटने राखी बांधली, भावाने आयुष्याची कमाईच हातावर ठेवली, पाहा भावनिक व्हिडिओ

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव वाढवणाऱ्या विनेश फोगाट हिच्या रक्षाबंधनाची जोरदार चर्चा आहे.

Namdeo Kumbhar

Raksha Bandhan 2024 Vinesh Phogat : आज देशभरात राखी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ज्यात बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि आणि भाऊ तिला आयुष्यभर सुरक्षेच वचन देतो. त्यासोबतच गिफ्टपण देतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव वाढवणाऱ्या विनेश फोगाट हिच्या रक्षाबंधनाची जोरदार चर्चा आहे. राखी बांधल्यानंतर विनेशला भावने आपल्या आयुष्यभराची कमाई भेट म्हणून दिली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोन्ही बहीण-भावांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

विनेश फोगाटचा हा व्हिडिओ चरखी दादरी बलाली या गावातील आहे. भारताची स्टार कुस्तीपट्टू विनेश फोगाट आणि भाऊ हरविंद्र हे व्हिडिओत दिसत आहेत. विनेश फोगाटने हरविंद्रला राखी बांधली. राखी बांधल्यानंतर भाऊ हरविंद्रने तिला ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल भेट म्हणून दिला. त्यानंतर विनेश भावाला म्हणते की, मी 30 वर्षांची झाली आहे. गेल्या वर्षी ५०० रुपये दिले होते.त्यानंतर भाऊ म्हणतो संपूर्ण आयुष्यात कमावलेली ही एकमेव रक्कम आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाहा व्हिडिओ

केंद्र सरकारला आपल्या बहिणीचा ऑलिम्पिक सामना पाहू द्या, असे आवाहन केल्यानंतर विनेश फोगाटचा भाऊ हरविंदर चर्चेत आला होता. हरविंदरचा व्हिसा रद्द झाला होता. त्यानंतर त्यांनी भारत सरकारकडे दाद मागितली. त्यानंतर तो चर्चेत आला होता.

पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने शानदार कामगिरी केली होती. तिने एकाच दिवसात तीन लढती जिंकून ५० किलो महिला फ्रीस्टाइल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मात्र पदक हुकले. सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिला प्रबळ दावेदार मानला जात होते. पण फायनलपूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT