Rajasthan Royals Team Sold 15000 crore saam tv
Sports

अबब! आयपीएलआधीच १५००० कोटींची डील, अख्खा संघ विकला; RR चा नवा मालक कोण?

Rajasthan Royals Sold : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी डील झाली आहे. तब्बल १५००० कोटींना राजस्थान रॉयल्स संघ विकला आहे. अमेरिकेच्या एका उद्योजकानं हा संघ खरेदी केला आहे.

Nandkumar Joshi

आयपीएल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, चार दिवस आधी मोठी डील झाली आहे. आयपीएलच्या पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाची विक्री झाली असून, तब्बल १५००० कोटींचा व्यवहार झाला आहे. राजस्थान संघाला आता नवा मालक मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती. अखेर १.६५ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीनंतर राजस्थान रॉयल्स संघाच्या विक्रीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिकेचे उद्योजक काल सोमानी आणि त्यांच्या कॉन्सोर्टियमने ही आयपीएलमधील सर्वात मोठी बोली लावली होती.

अमेरिकेतील उद्योजक सोमानी यांनी विक्रमी किंमतीला राजस्थान रॉयल्सचा संघ खरेदी केला आहे. रिपोर्ट्सनुसार, १५ हजार कोटी रुपयांना हा व्यवहार झाला आहे. इतक्या मोठ्या व्यवहारामुळं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

आयपीएलची सर्वात मोठी डील

आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी फ्रेंचाइजी डील मानली जात आहे. याआधी टोरेंट ग्रुपने गुजरात टायटन्सची ६७ टक्के भागीदारी जवळपास ५०२५ कोटींना खरेदी केली होती. त्याचे एकूण मूल्य ७५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. रिपोर्टनुसार हा व्यवहार यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतर लागू होईल. सध्याच्या घडीला संघाची मालकी उद्योजक मनोज बदाले यांच्याकडेच आहे. त्यांच्या इमर्जिंग मीडिया व्हेंचर्सकडे या संघाची जवळपास ६५ टक्के भागीदारी आहे.

राजस्थान रॉयल्स हा आयपीएलचा पहिला विजेता संघ होता. राजस्थानने २०२२ मध्येही फायनलपर्यंत धडक दिली होती. सध्या या संघाचं नेतृत्व रियान पराग करत आहे. तर श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा हा प्रशिक्षक आहे.

कोण आहेत काल सोमानी?

राजस्थान रॉयल्सचा संघ खरेदी करणारे काल सोमानी हे अमेरिकेतील एरिजोनास्थित स्कॉट्सडेलचे राहणारे यशस्वी उद्योजक आहेत. टेक्नॉलॉजी, डेटा प्रायव्हसी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, स्पोर्ट्स टेक आदी क्षेत्रांत काम करण्याचा १५ वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांना विशेष रस आहे.

मोटर सिटी गोल्फ क्लबचे ते सहमालक आहेत. विशेष म्हणजे आयपीएलचा सर्वात महागडा व्यवहार यावर्षी झाला असला तरी, काल सोमानी हे २०२१ पासूनच राजस्थान रॉयल्स संघाशी जोडले गेलेले आहेत. आता त्यांनी फ्रेंचाइजीची पूर्ण भागीदारी घेऊन संघाची मालकी घेण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचललेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजित पवार अपघात प्रकरणी कर्नाटकात गुन्हा दाखल

लोकलला अचानक मोठा झटका बसला; भीतीनं घामाघूम प्रवाशांच्या ट्रेनमधून धडाधड उड्या, दादर स्टेशनवर थरार

Lasun Chutney Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत ओली लसूण चटणी, भातासोबत लागते मस्त

Viral Video: रस्त्याच्या कडेला रोमान्स, Kiss करताना तोल गेला आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही!

Ashok Kharat Case: कोणत्या सीड्या बाहेर काढायच्या हे भाजपनं ठरवलंय; बच्चू कडूंचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT