Surabhi Jayashree Jagdish
हॉटेलच्या बाथरूममध्ये शॅम्पू, कंडिशनर, लोशन आणि बॉडी वॉशच्या छोट्या बाटल्या ठेवलेल्या असतात. या वस्तू गेस्टसाठी दिलेल्या असतात. म्हणून त्या तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.
खोलीत चहा, कॉफी, साखर आणि मिल्क पावडरचे छोटे पॅकेट्स ठेवलेले असतात.
हे सर्व कॉम्प्लिमेंटरी सुविधांमध्ये समाविष्ट असते. त्यामुळे हे पॅकेट्स तुम्ही सहजपणे सोबत घेऊ शकता.
अनेक हॉटेल्समध्ये टी-बॅग्स आणि इंस्टंट कॉफीचे सॅशे दिले जातात. हे गेस्टच्या वापरासाठीच ठेवलेलं असतात. म्हणून त्यासाठी वेगळे पैसे आकारले जात नाहीत.
काही हॉटेल्समध्ये डिस्पोजेबल चप्पलांची सुविधा दिली जाते. या चप्पलांचा वापर केल्यानंतर त्या पुन्हा वापरल्या जात नाहीत. त्यामुळे तुम्ही त्या घरी घेऊन जाऊ शकता.
अनेक ठिकाणी डेंटल किटही उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये टूथब्रश, टूथपेस्ट आणि माउथवॉशचा समावेश असतो. या वस्तू देखील पाहुण्यांना सोबत नेण्याची परवानगी असते.
हॉटेलमधील अशा छोट्या वस्तू सामान्यतः एकदाच वापरण्यासाठी दिलेल्या असतात.
त्यामुळे त्या वापरल्यानंतर हॉटेल त्यांचा पुन्हा उपयोग करत नाही. म्हणून या वस्तू नेल्यास अतिरिक्त शुल्क लागत नाही.
मात्र खोलीतील टॉवेल, हेअर ड्रायर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी नेऊ नयेत. कारण या वस्तू हॉटेलच्या कायमस्वरूपी मालमत्तेमध्ये येतात. अशा वस्तू नेल्यास तुमच्याकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकतात.