राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक Saam Tv
Sports

राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची Rahul Dravid टीम इंडियाच्या Team India मुख्य प्रशिक्षकपदी Head Coach नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

T-20 विश्वचषकावर रवी शास्त्रीचा Ravi Shastri कार्यकाळ संपणार आहे. आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळणार आहे. राहुल द्रविड भारत-न्यूझीलंड मालिकेपासून प्रशिक्षक पदाची सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल द्रविडने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे पद मिळणे हा माझ्याकरिता सन्मान आहे आणि या भूमिकेसाठी आपण तयार राहणार आहोत, असे राहुल द्रविडने सांगितले आहे.

रवी शास्त्रीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आणि मला अशा आहे, की संघाला पुढे घेऊन जाणार आहे. येत्या २ वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा येत आहेत आणि त्याठिकाणी चांगली कामगिरी करण्याचे आमचं ध्येय आहे, असा विश्वास राहुल द्रविडने व्यक्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

SCROLL FOR NEXT