राहुल द्रविड
राहुल द्रविड - Saam TV
क्रीडा | IPL

किवींविरुद्धच्या मालिकेसाठी द्रविड प्रशिक्षक?

साम टिव्ही

नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वकरंडकानंतर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल द्रविडला भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. Rahul Dravid may be the coach of Indian Team for NewZealand series

संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री Ravi Shastri यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वकरंडकानंतर World Cup संपुष्टात येत आहे आणि भारतीय क्रिकेट Cricket नियामक मंडळाला (बीसीसीआय) त्यांना बदली व्यक्तीचा शोध घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. अधिक माहीतीनुसार, अनेक परदेशी लोकांनी हे पद स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी बीसीसीआयला अनुभवी भारतीय खेळाडूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची इच्छा आहे.

यापूर्वी ही संधी माजी खेळाडू अनिल कुंबळेंना देण्यात आली होती मात्र, त्यावेळी कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी या पदाला सोडचिठ्ठी दिली होती. सध्या कुंबळेंनी स्वत: ला निवड प्रक्रियेपासून दूर ठेवले आहे. ते सध्या आयपीएलमध्ये ‘पंजाब किंग्ज’चे मुख्य प्रशिक्षक आहेत. Rahul Dravid may be the coach of Indian Team for NewZealand series

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला भारतीय कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले द्रविड वरिष्ठ संघासाठी पूर्णवेळ हवे आहेत. परंतु, द्रविडची जास्त प्रवास करण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने मंडळाला सध्या तरी नकार कळवलेला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने निवडीसाठी अधिकृतपणे कोणतीही जाहिरात दिली नसली तरी, त्यांनी यासाठी अनेक लोकांशी संपर्क साधला आहे. अजूनही याबाबत चर्चाच चालू असल्याने प्रशिक्षक निवड प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. Rahul Dravid may be the coach of Indian Team for NewZealand series

त्यामुळे नविन खेळाडूची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होईपर्यंत व न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी द्रविडने संघाचे अंतरिम प्रशिक्षक व्हावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेदरम्यान द्रविडने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी निभावली आहे. त्यामुळे त्याला याबाबतीत आग्रह होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राम मंदिरात पोहोचणार

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT