Rahkeem Cornwall Century twitter
Sports

Rahkeem Cornwall Century: वजनदार खेळाडूची दमदार खेळी! फक्त 45 चेंडूंमध्ये ठोकलं शतक; हटके सेलिब्रेशनचा VIDEO VIRAL

Rahkeem Cornwall Century Celebration: शतक झळकावल्यानंतर त्याने हटके सेलिब्रेशन केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Rahkeem Cornwall Celebration After Scoring Century:

वेस्टइंडीजचा वजनदार खेळाडू रहकिम कॉर्नवॉल हा गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या फिटनेसमुळे चर्चेत आला होता. कासव गतीने धावल्यामुळे हा फलंदाज धावबाद झाला होता. त्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला होता.

आता त्याने तुफानी शतकी खेळी करत टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने अवघ्या ४५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आहे.

रहकिम कॉर्नवॉलने सेंट किट्स अँड नेविस संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ चौकार आणि १२ षटकारांसह ४५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आहे. यादरम्यान त्याने २१२.५० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

या शतकी खेळीनंतर त्याने हटके सेलिब्रेशन केल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. शतक पूर्ण करताच त्याने बॅट हवेत नेत खाली फेकली. या बॅट ड्रॉप सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

बारबाडोस संघाचा विजय...

रहकिम कॉर्नवॉलच्या या खेळीच्या बळावर बारबाडोस संघाने २२१ धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग केला आहे. सेंट किट्स अँड नेविस प्रेटियट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ४ गडी बाद २२० धावा केल्या होत्या.

सेंट किट्स अँड नेविस प्रेटियट्स संघाकडून विल समीदने ६३ आणि शेरफन रुदरफोर्डने ६५ धावांची खेळी केली. तर सलामीला आलेल्या आंद्रे फ्लेचरने ५६ धावांची ताबडतोड खेळी केली होती. (Latest sports updates)

शतक झळकावल्यानंतर झाला रिटायर्ड..

रहकिम कॉर्नवॉलने आपल्या खेळीदरम्यान तुफान फटकेबाजी केली. विरोधी संघातील गोलंदाज त्याला बाद करू शकले नव्हते. शेवटी त्याने स्वत:च मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. २२१ धावांचा पाठलाग करत असताना रहकिम कॉर्नवॉलसह रोमेन पॉवेलने २६ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT