r ashwin  Saam tv
क्रीडा

IND VS AUS 3rd Test: अखेर अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे, बनला भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Aus R Ashwin record: इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये बरोबरीचा खेळ पाहायला मिळाला आहे.

दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडून काढला आहे. (Latest sports updates)

आर अश्विन हा सध्या भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात २ गडी बाद करताच इतिहासाला गवसणी घातली आहे. त्याने कपिल देव यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६८७ गडी बाद करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. आता तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

भारतीय संघासाठी सार्वधिक गडी बाद करण्याचा विक्रम हा अनिल कुंबळेंच्या नावे आहे. अनिल कुंबळे यांनी ९५६ गडी बाद केले आहेत. तर ७११ गडी बाद करण्यासह हरभजन सिंग या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आता आर अश्विन या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने कपिल देव यांना मागे सोडलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

१) अनिल कुंबळे -९५६ गडी

२) हरभजन सिंग -७११ गडी

३) आर अश्विन -६८९ गडी

४) कपिल देव- ६८७ गडी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

१) मुथय्या मुरलीधरन - ८०० गडी

२) शेन वॉर्न -७०८ गडी

३) जेम्स अँडरसन -६८५ गडी

४) अनिल कुंबळे -६१९ गडी

५) स्टुअर्ट ब्रॉड - ५७६ धावा

६)ग्लेन मॅकग्रा - ५६३ गडी

७)कोर्टनी वॉल्श -५१९ गडी

८) नॅथन लायन -४७१ गडी

९) आर अश्विन - ९६६ गडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT